Pune Admission : औंध आयटीआयमध्ये ३३ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

या अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
 Colleges Admission News
Colleges Admission Newsesakal
Updated on

Pune Admission - औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) एक ते दोन वर्ष मुदतीच्या ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये एक हजार ६६४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेत ११ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

 Colleges Admission News
Engineering Degree Admission : अभियांत्रिकी पदविकेला पसंती! 28 हजार 750 जणांची नोंदणी

या अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये ३० टक्के  जागा मुलींसाठी आरक्षित आहेत. ११ जुलैपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायचा असून १२  जुलैपर्यंत प्रवेश अर्ज निश्चित करून विकल्प भरण्याची संस्थेमध्ये सुविधा आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शंभर विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरला परंतु निश्चित करून विकल्प भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या पसंतीक्रमानुसार विकल्प भरावेत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 Colleges Admission News
Mumbai News : पोलीसांकडून बनावट शेअर ट्रेडिंग कंपनीचे रॅकेट उघड; 3 महिन्यात कोटीची उलाढाल

या आयटीआयमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून एरोनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्विपमेंट फिटर हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम नव्याने सुरु केला आहे. हा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर विमान कंपनीमध्ये तसेच वाहन उद्योगांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

डेसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीने नागपूर येथे नवीन शाखा स्थापन केलेली आहे. ही कंपनी औंध येथील आयटीआयमध्ये तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी -

- प्रवेशासाठी संस्थेत प्रत्यक्ष भेटावे

- संस्थेचा हेल्पलाइन क्रमांक : ८८५७९८४८२२

- संकेतस्थळ : http://admission.dvet.gov.in

 Colleges Admission News
Mumbai News : तांत्रिक बिघाड लोकल सेवा खोळब! मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेचे बिघाड सत्र सुरूच!

‘आयटीआय’मधील एक वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम -

- कारपेंटर (वुड वर्क टेक्निशियन), फोटोग्राफर, सुईंग टेक्नोलॉजी, सेक्रेटरियल प्रॅक्टीस (इंग्रजी), मेकॅनिक डिझेल, स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट (इंग्रजी), शिट मेटल वर्कर, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, मेसन, कॉम्पुटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर आणि प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर.

 Colleges Admission News
Mumbai News : धोकादायक इमारती खाली करा अन्यथा...; मंडळाकडून कठोर पाऊले उचलली जाणार

‘आयटीआय’मधील दोन वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम -

- मशिनिस्ट, फिटर, मशिनिस्ट ग्राइंडर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक मशिन टुल मेन्टेनन्स, टर्नर, टूल ॲण्ड डायमेकर (डाइज ॲण्ड मोल्ड), टूल ॲण्ड डायमेकर (प्रेस टूल्स, जिग्ज आणि फिक्चर), ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिव्हिल, इलेक्ट्रोप्लेटर, सर्व्हेअर, पेंटर (जनरल), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर, वायरमन आणि रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर टेक्निशियन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.