Pune News : मिठाई, फरसाण, डेअरी व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी संघटित व्हावे - फिरोज नक्वी

पुणे शहरातील मिठाई, फरसाण, डेअरी व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी संघटित व्हावे, असे आवाहन फेडरेशन ऑफ स्वीट्स अँड नमकीन मॅन्युफॅक्चरर्सचे संस्थापक फिरोज नक्वी यांनी येथे केले.
sweet mart
sweet martsakal
Updated on
Summary

पुणे शहरातील मिठाई, फरसाण, डेअरी व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी संघटित व्हावे, असे आवाहन फेडरेशन ऑफ स्वीट्स अँड नमकीन मॅन्युफॅक्चरर्सचे संस्थापक फिरोज नक्वी यांनी येथे केले.

पुणे - पुणे शहरातील मिठाई, फरसाण, डेअरी व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी संघटित व्हावे, असे आवाहन फेडरेशन ऑफ स्वीट्स अँड नमकीन मॅन्युफॅक्चरर्सचे संस्थापक फिरोज नक्वी यांनी येथे केले.

पुण्यातील मिठाई, फरसाण, डेअरी असोसिएशनच्या वतीने एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष संजय चितळे हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहआयुक्त शिवाजी देसाई, फूड सेफ्टी तज्ज्ञ शशांक जोशी, असोसिएशनचे कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी, सचिव अमित अग्रवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

फिरोज नक्वी पुढे म्हणाले, ‘भारतीय खाद्य संस्कृतीत मिठाई, फरसाण आणि दुग्धजन्य पदार्थांना एक वेगळे स्थान आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण होत आहे. विशेषतः युवा पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे युवा पिढीला आपल्या या पारंपारिक खाद्य पदार्थांचे महत्त्व कळण्यासाठी ब्रॅंडिंग , पॅकेजिंग यावर भर दिला पाहिजे.’

या मेळाव्यात शिवाजी देसाई यांनी नव्या कार्यकारिणीला शपथ दिली. संजय चितळे यांनी या व्यावसायातील ७० टक्के व्यावसायिक असंघटित असल्याचे सांगितले. सचिव अमित अग्रवाल प्रास्ताविक केले. इंद्रनील चितळे व सुमीत अग्रवाल यांनी युवा पिढीसाठीच्या युथ फोरम या उपक्रमाची माहिती दिली. मिलिंद कुलकर्णी सूत्रसंचालन केले. मकरंद गाडवे यांनी आभार मानले.

ज्येष्ठ व्यावसायिकांचा सन्मान

या मेळाव्यात माधव चितळे, तोलाराम चौधरी, अमरनाथ अग्रवाल, लेखराज अग्रवाल, नारायण घोडके, श्रीकृष्ण चितळे, सुरेंद्र गाडवे,अरविंद बुधानी या ज्येष्ठ व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवराज गाडवे, अनिल गाडवे, कैलास झंवर, इंद्रनील चितळे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.