पुणेकरांचा कल मोफत लसीकरणाकडे

- गेल्या १५ दिवसात खासगीपेक्षा महापालिकेद्वारे ५६ हजार जणांचे लसीकरण जास्त
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination
Updated on

पुणे : शहरात खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क तर महापालिकेच्या (pune coporation) केंद्रांवर मोफत लसीकरण केले जात आहे. गेल्या चार महिन्यात एकूण आकडेवारीत खासगी रुग्णालयांनी महापालिकेपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. मात्र, गेल्या १५ दिवसात महापालिकेला कोव्हिशील्डचे सुमारे दीड लाख डोस मिळाल्याने पालिकेच्या केंद्रांवर लसीकरणाचा (vaccine) वेग वाढलाय आहे. या काळावधीत खासगीपेक्षा महापालिका केंद्रांवर ५६ हजाराने जास्त लसीकरण झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

केंद्र सरकारने २१ मे २०२१ पासून खासगी रुग्णालयात १८ च्या पुढील वयोगटाचे लसीकरण करण्यास परवानगी दिली. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हीशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुटनीक या तीन लस उपलब्ध आहेत. तर महापालिकेला केंद्र सरकारतर्फे कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सीन लस पुरविली जाते. खासगी रुग्णालयांनी थेट कंपनीकडून लस खरेदी केली असल्याने ते त्यांच्याकडे लस उपलब्ध आहे, आॅनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण केले जात आहे.

corona vaccination
पिंपळे सौदागरातील दोन हॉटेलवर छापे

यामध्ये अनेक रुग्णालयांनी थेट विविध कंपन्यास सोसायट्यांशी करार करून जोरदार लसीकरण मोहिम राबविली होती. त्यामुळे खासगीतील लसीकरणाचा वेग वाढला होता. त्या तुलनेत महापालिकेला शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने मोफत लसीसाठी वाट पहावी लागत होती. २१ मे ते १५ आॅगस्ट या कालावधी महापालिकेच्या केंद्रांवर ७ लाख ९९ हजार ३४२ जणांनी लस घेतली आहे. तर खासगी रुग्णालयात ९ लाख ७३ लाख १९४ जणांनी लस घेतली. महापालिकेच्या तुलनेत खासगी रुग्णालयात १ लाख ७३ हजार ८५२ जणांचे जास्त लसीकरण झाले आहे.

आॅगस्ट महिन्यात यामध्ये बदल दिसून आला आहे. १ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या कालावधीत महापालिकेने कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन ही लस १ लाख ५० हजार ६६२ जणांना दिली. तर खासगी रुग्णालयात ९४ हजार ९६ जणांनी सशुल्क लसीकरण करून घेतले आहे. केंद्राकडून नियमीत लस उपलब्ध होत नसल्याने आठवड्यातील दोन-तीन दिवस महापालिकेचे लसीकरण बंद रहात असल्याने नागरिक हवालदिल होत आहेत. मात्र,गेल्या १५ दिवसात महापालिकेला १ लाख४६ हजार कोव्हीशील्डचे डोस मिळाल्याने महापालिकेच्या लसीकरणाला गती आली आहे. पुण्यासाठी रोज किमान ४० हजार डोस उपलब्ध झाले तर महापालिका लसीकरणात आणखीआघाडी घेऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

corona vaccination
राज्यात कोरोनाचे 97 टक्के रुग्ण बरे

आज लसीकरण बंद

महापालिकेकडील कोव्हीशील्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लसीचा साठा संपला आहे. शासनाकडून नव्याने लस पुरवठा झालेला नसल्याने उद्या (मंगळवारी) शहरातील लसीकरण केंद्र बंद असतील. लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन कळविले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.