सासवडला कोरोना समूह संसर्ग बळावला; एका दिवसात उच्चांकी रुग्णवाढीची नोंद

Community spread
Community spread
Updated on

सासवड (पुणे) : कोरोना महामारीच्या लॉकडाऊनला वर्ष होऊन गेले. परंतु, आज सासवड शहराने कोरोना बाधित रुग्णांचा उच्चांक कम्युनिटी स्प्रेड (समुह संसर्ग) पद्धतीने गाठला आहे. आज येथे  एका दिवसात 46 बाधीत रुग्ण आढळले. तर पुरंदर तालुक्यात दिवसभरात 90 रुग्ण निष्पन्न झाले. यापूर्वीचा सर्वाधिक आकडा मागील आठवड्यातच 34 होता. तीन दिवसांपूर्वी खाली आलेला आकडा आज पुन्हा उच्चांकी झाला. आता येथे कोरोना उद्रेक झाल्याचे स्पष्ट होत आहे. सासवडला 46, जेजुरीला 11 रुग्ण सापडले. तालुक्याच्या ग्रामीण भागातही दिवसभरात 31 रुग्ण आढळले. त्यामुळे अनेक गावे कोरोनाने गाठल्याचे दिसत आहे.

कोरोना महामारीची दुसरी लाट येथे धडकली असून याला त्रिसूत्रीच्या शिस्तीने तोंड दिल्यास त्याची बाधा होणे टाळता येते. न घाबरता सामुहिक लढाई महत्वाची आहे. ज्यांना बाधा होईल, त्यांनी तर वेळेत निदान करुन सकारात्मक विचाराने कोरोनाला हरवावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत. तरीही पोलीस गेली दोन आठवडे रस्त्यावर थांबतात, दंड करत आहेत. तेंव्हा कुठे 70 ते 80 टक्के लोक आता मास्क लावण्यास शिकले आहेत. सासवड (ता. पुरंदर) येथील विविध दुकानांतील गर्दी, बाजारपेठेतील गर्दी, विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी, होळी व  धुलीवंदनाचा निष्कारण उत्साह पाहता तरीसुध्दा अनेक लोक अजूनही पूर्णतः जागृत झाले नसल्याचे दिसत आहे. सासवड कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने नगरपालिकेने कोरोना बाबत कडक भूमिका घेतल्याचे पालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात काल मंगळवारी दिवसभरात 6 हजार 206 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. कालच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 3 हजार 226 रुग्णांचा समावेश होता. दिवसभरात 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिवसातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील 27 मृत्यू होते. तर 6 हजार 55 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. शहरातील सर्वाधिक 27 मृत्यूबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 11, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि नगरपालिका हद्दीतील 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()