पुणे- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या टॉप टेन हॉटस्पॉट गावांमध्ये पुणे शहरालगतच्या सात मोठ्या गावांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी तेरा टक्के रुग्ण हे फक्त या शहरालगतच्या गावांमधील आहेत. यावरुन जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढण्यास शहरालगतची गावेच कारणीभूत ठरू लागली आहेत. या गावांची सर्वाधिक झळ ग्रामीण भागाला बसू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ग्रामीण भागातील हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. यापैकी जिल्ह्यातील टॉप टेन कोरोना हॉटस्पॉटची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील दहापैकी सात गावे ही पुणे शहरालगतची आहेत. यात वाघोली, मांजरी बुद्रूक, उरुळीकांचन, नऱ्हे (सर्व ता. हवेली), बावधन, हिंजवडी व सूस (ता. मुळशी) ही सात गावे आहेत. उर्वरित तीन गावांमध्ये शिक्रापूर व रांजणगाव गणपती (दोन्ही ता. शिरूर) आणि मंचर नंबर १ (ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १३२ हॉटस्पॉट आहेत. हवेली तालुक्यात सर्वाधिक २४ हॉटस्पॉट असून दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात केवळ एक हॉटस्पॉट आहे. सध्या वेल्हे तालुक्यात एकही हॉटस्पॉट नाही. दरम्यान, ग्रामीण भागात सध्या ९ हजार ३२७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी ४ हजार २० रुग्णांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित २ हजार ४२१ जण हे गृहविलगीकरणात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
टॉप टेन हॉटस्पॉट व रुग्णसंख्या
- वाघोली --- २२०
- शिक्रापूर --- १५६
- हिंजवडी --- १३०
- उरुळीकांचन --- १२९
- नऱ्हे --- १००
- मांजरी बुद्रूक --- ९९
- बावधन --- ९८
- मंचर नंबर १ --- ८१
- रांजणगाव गणपती --- ७६
- सूस --- ७६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.