पुणे : जिल्ह्यातील शुक्रवारी 1367 नवे कोरोना रुग्ण आढळले त्यापैकी पुणे शहरात 239, पिंपरी चिंचवडमध्ये 251 , पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 715, नगरपालिका क्षेत्रात 124, कॅन्टोमेंट बोर्डात 38 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात 1852 रुग्ण कोरानातून मुक्त झाले तर 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात गेल्या 24 तासात नव्याने २३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७३ हजार ५३९ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ४५६ इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या ३ हजार ३२० रुग्णांपैकी ५१९ रुग्ण गंभीर तर ९२३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. आज एकाच दिवसात ६ हजार ७६ नमुने घेण्यात आले असून शहरात एकूण टेस्ट संख्या आता २५ लाख ६७ हजार ४१२ इतकी झाली आहे. शहरातील ३६७ कोरोनाबाधितांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला असून शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६१ हजार ७६३ झाली आहे.
पुणे कोरोना अपडेट : शुक्रवार दि.११ जून,२०२१
◆ उपचार सुरु : ३,३२०
◆ नवे रुग्ण : २३९ (४,७३,५३९)
◆ डिस्चार्ज : ३६७ (४,६१,७६३)
◆ चाचण्या : ६,०७६ (२५,६७,४१२)
◆ मृत्यू : ९ (८,४५६)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.