पुणे: कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्याच्या या रुग्णवाढीस कारणीभूत ठरत असून भीतीचं वातावरण राज्यामध्ये आहे. राज्यातील प्रमुख शहरे मुंबई-पुण्यामध्येही रुग्णसंख्या वाढत असून मुंबईतील रुग्णसंख्या वीस हजारच्याही पार गेली आहे. तर पुण्यातील रुग्णसंख्येमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे.
पुणे मनपा हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या पुण्यात असणाऱ्या १४ हजार ८९० सक्रीय रुग्णांपैकी केवळ ५.४८ टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल पुण्यामध्ये एका दिवशी २,४७१ रुग्ण सापडले होते. दैनंदिन रुग्णसंख्येत आज वाढ झालेली पहायला मिळाली आहे. या परिस्थितीविषयी बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हटलंय की, पुण्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच !
पुणे कोरोना अपडेट
◆ उपचार सुरु : १४,८९०
◆ नवे रुग्ण : ४,०२९ (५,२६,०३५)
◆ डिस्चार्ज : ६८८ (५,०२,०१८)
◆ चाचण्या : १८,०१२ (३९,७७,३८१)
◆ मृत्यू : १ (९,१२७)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.