Corona: पुण्यात दिलासादायक परिस्थिती; मात्र काळजी आवश्यकच

Corona: पुण्यात दिलासादायक परिस्थिती; मात्र काळजी आवश्यकच
Updated on

पुणे : पुण्यात (Pune Corona Update) आज एक हजारच्या आसपास नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही साडेचार लाखांच्या वर पोहोचली आहे. पुण्यात सध्या 15 हजारच्या वर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात आज अडीच हजारच्या आसपास रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ४,३९,०९७ वर पोहोचली आहे. पुण्यात आज 11 हजार चाचण्या झाल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह पुण्यातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही २३,९२,०९८ वर पोहोचली आहे. (Pune Corona Update Only one thousand patients found in Pune Today)

Corona: पुण्यात दिलासादायक परिस्थिती; मात्र काळजी आवश्यकच
Corona Update: मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
Corona: पुण्यात दिलासादायक परिस्थिती; मात्र काळजी आवश्यकच
Corona Update: राज्यात गेल्या 24 तासात 34 हजार नवे रुग्ण

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ८४३ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १५ हजार २३२ रुग्णांपैकी १,३४८ रुग्ण गंभीर तर ४,७५४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात १० हजार ८०६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख ९२ हजार ०९८ इतकी झाली आहे. शहरातील २ हजार ४०७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ३९ हजार ०९७ झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने १,१६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६२ हजार १७२ इतकी झाली आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra corona update) मंगळवारच्या तुलनेत वाढ झालीये. गेल्या 24 तासांत राज्यात 34 हजार 031 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 51 हजार 457 नव्या रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. गेल्या 24 तासांत राज्यात 594 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 54 लाख 67 हजार 537 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 49 लाख 78 हजार 937 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 91.06 टक्के झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 4 लाख 01 हजार 695 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 84 हजार 371 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()