पिंपरी : राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. हा विकेंड लॉकडाउन शुक्रवारी (ता.९)सायंकाळी सहा वाजता सुरु होत असून तो सोमवारी (ता.१२)सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार त्याबाबत तपशीलवार माहिती...
-नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे –
सोमवार ते शुक्रवार – कोविड निर्देशांचे पालन करून जास्तीत जास्त पाच जणांनी एकत्र फिरण्यास परवानगी (सकाळी सात ते सायंकाळी सहा)
विकेंड लॉकडाऊन – अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध
# फक्त अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना कर्मचारी
सोमवार ते शुक्रवार – ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी
विकेंड लॉकडाऊन – ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी
- संचारबंदीमधून हॉस्पिटल, मेडिकल शॉप्स, इन्शुरन्स कार्यालय, औषध विक्रेते व कंपन्या, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक वगळण्यात आले आहेत. हे घटक पूर्ण वेळ सुरु राहतील.
- रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा, स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्सूनपूर्व कामे, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई-कॉमर्स, मान्यताप्राप्त मिडिया यांनाही संचारबंदी मधून वगळण्यात आले आहे. या सेवा २४ तास सुरु राहतील.
- पशुवैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, कृषी संबंधी सेवा
सोमवार ते शुक्रवार – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु
विकेंड लॉकडाऊन – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु
- मोकळ्या जागांवरील उपक्रम मनोरंजन पार्क, बगीचे, प्रेक्षागृहे, सार्वजनिक मैदाने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
- दुकाने, मार्केट, मॉल्स (अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून) बंद राहतील.
-अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने (किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्यदुकाने, मटण, मासे, अंडी दुकाने)
सोमवार ते शुक्रवार – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु राहतील
विकेंड लॉकडाऊन – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु राहतील
-पेट्रोलपंप, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन, कार्गो सेवा, डाटा सेंटर्स, क्लाउड सर्विस पुरवठादार, माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा, शासकीय, खाजगी सुरक्षा सेवा, गॅरेज
सोमवार ते शुक्रवार – पूर्ण वेळ सुरु राहतील
विकेंड लॉकडाऊन – पूर्ण वेळ सुरु राहतील
- ऑटो रिक्षा
सोमवार ते शुक्रवार – पूर्ण वेळ सुरु (वाहन चालक + दोन प्रवासी)
विकेंड लॉकडाऊन – पूर्ण वेळ सुरु (वाहन चालक + दोन प्रवासी)
-टॅक्सी, कॅब
सोमवार ते शुक्रवार – पूर्ण वेळ सुरु (वाहन चालक + आरटीओने निर्धारित केलेल्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी)
विकेंड लॉकडाऊन – पूर्ण वेळ सुरु (वाहन चालक – आरटीओने निर्धारित केलेल्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी)
- बस सेवा
सोमवार ते शुक्रवार – मर्यादित प्रमाणात (उभे राहणारे प्रवासी घेण्यावर बंदी)
विकेंड लॉकडाऊन – मर्यादित प्रमाणत (उभे राहणारे प्रवासी घेण्यावर बंदी)
- रेल्वे
सोमवार ते शुक्रवार – सुरु
विकेंड लॉकडाऊन – सुरु
# खाजगी वाहने, खाजगी बसेस
सोमवार ते शुक्रवार – सुरु (आरटीओने निर्धारित केलेल्या आसन क्षमतेएवढेच प्रवासी) सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत
विकेंड लॉकडाऊन – बंद
- खाजगी वाहने, खाजगी बसेस फक्त औद्योगिक कामासाठी
सोमवार ते शुक्रवार – पूर्ण वेळ सुरु
विकेंड लॉकडाऊन – पूर्ण वेळ सुरु
-सिनेमा हॉल, ड्रामा थिएटर्स, सभागृहे, मनोरंजन पार्क, आर्केड्स, व्हिडीओ गेम पार्लर, क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
सोमवार ते शुक्रवार – बंद
विकेंड लॉकडाऊन – बंद
- रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स
सोमवार ते शुक्रवार – फक्त फूड पार्सल, टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सुविधा (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
विकेंड लॉकडाऊन – फक्त फूड होम डिलिव्हरी सुविधा
-उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री
सोमवार ते शुक्रवार – फक्त पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सुविधा (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
विकेंड लॉकडाऊन – बंद
- बँका, वीज वितरण कंपनी, टेलिकॉम कंपनी, विमा मेडिक्लेम कंपनी, औषधी वितरण, निर्मिती कार्यालये
सोमवार ते शुक्रवार – पूर्णवेळ सुरु
विकेंड लॉकडाऊन – पूर्णवेळ सुरु
- इतर खाजगी कार्यालये
सोमवार ते शुक्रवार – बंद
विकेंड लॉकडाऊन – बंद
# सेबी, सेबी अंतर्गत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, गुंतवणूक व क्लिअरिंग कार्पोरेशन, सेबी अंतर्गत नोंदणीकृत संस्था, आरबीआय अंतर्गत नोंदणीकृत व मध्यवर्ती संस्था उदा. स्वतंत्र प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीएल, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, फायनान्शीयल मार्केट, सर्व प्रकारचे नॉन बँकिंग वित्तीय संस्था, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, सीए, वकिलांचे कार्यालये, कस्टम हाउस एजंट, लसीकरणाशी संबंधित परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, जीवरक्षक औषधे, औषधी उत्पादने
सोमवार ते शुक्रवार – सुरु (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
विकेंड लॉकडाऊन – सुरु (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
-आरोग्य सेवा, वीज, पाणी, बँकिंग, वित्तीय सेवा, आपत्ती व्यवस्थापन
सोमवार ते शुक्रवार – १०० टक्के उपस्थिती
विकेंड लॉकडाऊन – १०० टक्के उपस्थिती (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
- इतर शासकीय कार्यालये
सोमवार ते शुक्रवार – ५० टक्के उपस्थिती
विकेंड लॉकडाऊन – ५० टक्के उपस्थिती (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
- शासकीय बैठका
सोमवार ते शुक्रवार – फक्त ऑनलाईन
विकेंड लॉकडाऊन – फक्त ऑनलाईन
-शासकीय कार्यालयात अभ्यांगत (पोलीस स्टेशन वगळता)
सोमवार ते शुक्रवार – प्रवेश बंदी
विकेंड लॉकडाऊन – प्रवेश बंदी
- शासकीय कार्यालय पूर्व परवानगी घेऊन भेट घेणारा अभ्यांगत
सोमवार ते शुक्रवार – भेट देण्यापूर्वी ४८ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असेल तरच प्रवेश
विकेंड लॉकडाऊन – प्रवेश बंदी
- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस
सोमवार ते शुक्रवार – बंद
विकेंड लॉकडाऊन – बंद
# शाळा, महाविद्यालये केवळ इयत्ता दहावी ते बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी व परीक्षेसंबंधित स्टाफ यांना परीक्षेकामी ये-जा करणे
सोमवार ते शुक्रवार – सूट (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
विकेंड लॉकडाऊन – सूट (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
- बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरण यांची परीक्षा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची परवानगी घेऊन
सोमवार ते शुक्रवार – सूट (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
विकेंड लॉकडाऊन – सूट (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
- धार्मिक, स्थळे, प्रार्थना स्थळे (नियमित अर्चक यांना पूजा करण्याची सूट राहील), केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील
- वृत्तपत्र वितरण सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु राहील. छपाई पूर्ण वेळ सुरु राहील.
- धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहतील
- पूर्व परवानगी घेऊन लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत
सोमवार ते शुक्रवार – सूट (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
विकेंड लॉकडाऊन – संबंधित प्रभाग क्षेत्रीय कार्यालये व संबंधित पोलीस स्टेशन यांची पूर्व परवानगी घेणे आवशयक राहील (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत)
-अंत्यविधी कार्यक्रम केवळ २० लोकांच्या उपस्थितीत पूर्ण वेळ सुरु राहील
- उत्पादन करणा-या आस्थापना, कंपन्या, घटक पूर्ण वेळ सुरु राहतील
- ई-कॉमर्स
सोमवार ते शुक्रवार – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
विकेंड लॉकडाऊन – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
-बांधकामाच्या ठिकाणी मजुरांना राहण्याची सोय नसल्यास तसेच बांधकाम, विकासकामांसाठी लागणारी सामग्री ने-आण करणे
सोमवार ते शुक्रवार – पूर्ण वेळ सुरु राहील
विकेंड लॉकडाऊन – पूर्ण वेळ सुरु राहील
- बांधकाम व्यावसायिक, वास्तू विशारद यांचे साईट ऑफिस
सोमवार ते शुक्रवार – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
विकेंड लॉकडाऊन – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
- कोविड लसीकरण पिंपरी-चिंचवड महापालिकेने परवानगी दिलेल्या वेळेत सुरु राहील
- कोविड चाचणी पूर्ण वेळ सुरु राहील
- घरकाम करणारे कर्मचारी यांची कामावर ये-जा करण्यासाठी
सोमवार ते शुक्रवार – सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु
विकेंड लॉकडाऊन – बंद
- वाईन्स, लिकर्स, बेव्हरेजेस
सोमवार ते शुक्रवार – फक्त बार, वाईन शॉप, ई शॉपिंग द्वारे पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सुविधा (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु)
विकेंड लॉकडाऊन – फक्त बार, वाईन शॉप, ई शॉपिंग द्वारे पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सुविधा (सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत सुरु)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.