पुणे : कोजागिरीच्या रात्री काँग्रेसमध्ये धूळवड

हा वाद शांत करण्यासाठी बुधवारी होणारी मुख्यसभा तहकुब करण्यात आली.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे : "महापालिकेच्या कार्यपत्रिकेवर काँग्रेस नगरसेवकाच्या विरोधात असलेला प्रस्ताव मंजूर करा आमच्याकडून तीव्र विरोध होणार नाही" असा शब्द एका ज्येष्ठ व प्रमुख नगरसेवकाने भाजपच्या पदाधिकार्यांना दिला. मात्र या फोनची क्लीप व्हायरल झाल्यानंतर या काँग्रेसच्या दोन नगरसेवकामध्ये जोरदार वाद झाला. हा वाद प्रदेश पातळीवरील नेत्यां पर्यंत पोहोचला. त्यानंतर हा वाद शांत करण्यासाठी बुधवारी होणारी मुख्यसभा तहकुब करण्यात आली.

आज सकाळी साडे अकरा वाजता सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्याची मुख्यसभा बोलविण्यात आली होती. कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी बांग्लादेशात मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध म्हणून व यात केंद्र सरकारने भूमिका घेण्याची विनंती करावी अशी तहकुबी मांडली. मुख्यसभा अचानक का तहकुब झाली हे अनेक नगरसेवकांना कळाले नाही. तहकुब करताना पुढची सभा आॅक्टोबर महिन्यात घ्यायची की नोव्हेंबर महिन्यात घ्यायची यावरून सत्ताधारी व विरोधकात किरकोळ वाद झाले. त्यानंतर अखेर २५ आॅक्टोबर रोजी मुख्यसभा घेण्याचा निर्णय झाल्याने हा वादग्रस्त विषय काही दिवस पुढे ढकलला गेला. मात्र, रात्री झालेल्या काँग्रेसमधील राड्याची चर्चा पालिकेत रंगली होती.

Pune Municipal Corporation
IND vs PAK: पार्थिवने निवडलं Playing XI, जाणून घ्या संघ!

भवानी पेठेतील महापालिकेची मिळकत

नगरसेवकाच्या संस्थेच्या ताब्यातून काढूनचा विषय क्रमांक २९९ हा आॅक्टोबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर आहे. यावरून भाजप व काँग्रेस मधील दोन नगरसेवकांची टोकाची भांडणे आहेत. हा विषय भाजप नगरसेविकेने प्रतिष्ठेचा केला असून, यासंदर्भात नगरसेविका व काँग्रेसच्या वरिष्ठ नगरसेवकाची चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा विषय मंजूर करण्यास हरकत नाही असे काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर मंगळवारी रात्री यासंदर्भात भाजपच्या एका प्रमुख पदाधिकार्या सोबत काँग्रेसचे वरिष्ठ नगरसेवक, भाजप नगरसेविकेचे पती यांच्याशी काँन्फरन्स काॅलवर चर्चा केली. त्यावेळीही काँग्रेस नगरसेवकाने तुम्ही विषय मंजूर करा, मी दाखविण्यासाठी विरोध करेन असे सांगितले.

हा काॅल झाल्यानंतर या संभाषणाची क्लीप काँग्रेसच्या नगरसेवकाने या वरिष्ठ नगरसेवकास पाठवून माझ्या विरोधात कशी भूमिका घेतली असा जाब विचारला. हा वाद एवढ्यावरच न रहाता काँग्रेसचे प्रदेशापातळीवरील नेते, माजी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांपर्यंत गेला. या गोंधळामुळे कोजागरीच्या रात्री शहरातील राजकारण चांगलेच तापले होते. अखेर भाजपच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून आजची होणारी मुख्यसभा तहकूब करून या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.