वाकडेवाडीत अतिक्रमणांवर महापालिकेकडून हातोडा

स्टॉलधारक संतप्त, ठिय्या आंदोलनाचा इशारा
वाकडेवाडीत अतिक्रमणांवर महापालिकेकडून हातोडा
वाकडेवाडीत अतिक्रमणांवर महापालिकेकडून हातोडाsakal
Updated on

खडकी : वाकडेवाडीतील कामगार कार्यालयाच्या लगतच्या पदपथावरील विविध अनधिकृत स्टॉल व हातगाड्यांवर गुरुवारी (ता.२६) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस पथकासह धडक कारवाई केली. यात जवळपास सात ते आठ स्टॉल सील केले, तर काही स्टॉल व हातागड्या जप्त केल्या. दरम्यान, आम्हाला याबाबत कोणतीही सूचना अतिक्रमण विभागाने दिली नसून, थेट कारवाईमुळे आमच्या सामानाचे नुकसान झाले आहे. कागदपत्र, परवाने असूनसुद्धा ते न पाहताच धडक कारवाई योग्य नसल्याचे सांगत स्टॉलधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देणार असून, दोन दिवसांत योग्य निर्णय न दिल्यास महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा श्रमिक पाथरी हातगाडी संघटनेचे अध्यक्ष गोकुळ अडागळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला. या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

लॉकडाउनमुळे बिकट परिस्थिती झाली असताना आता कुठे सुरळीत होत होते तर काल सगळी स्टॉल सील केले गेले आणि आज पोलिस घेऊन कारवाई केली. हे खूप अन्यायकारक आहे. आम्ही आता कस जगायचं? असे स्टॉलधारक रवींद्र गवळी यांनी सांगितले. आम्ही वेळोवेळी कर भरतो. स्वच्छतेसाठी दोनशे रुपयांची पावती फाडतो. आमची सगळी कागदपत्रे असताना आमची दुकाने का सील केली कळत नाही. आमचे हातावर पोट आहे. आता दुकाने बंद तर आम्ही कमवणार काय आणि खाणार काय? असे स्टॉलधारक अजीज शेख म्हणाले.

परवानाधारक दुकानात नाही म्हणून दुकान सील केले. माझी आई ८६ वर्षांची आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणून ती दुकानात बसू शकत नाही. आता सील काढायचे म्हणजे १० ते १५ हजार खर्च कसा परवडणार आम्हाला?

- संतोष मूल्या, स्टॉलधारक

दोन तास झाले कारवाई सुरू आहे; मात्र एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी फिरकला नाही. आता आम्ही कोणाकडे दाद मागायची?

- शैलेश नेमाने, सामाजिक कार्यकर्ते

हे काम दैनंदिन कामापैकी आहे. जी दुकाने, स्टॉल अनधिकृत आहेत, भाडेतत्त्वावर दिलेली आहे, अशांवर स्थानिक पोलिस बंदोबस्तात कारवाई होत आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास उपायुक्त एम. जगताप साहेब त्यांच्याकडे जा.

- दत्तात्रय लंघे, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.