स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोमवारी १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyarisakal
Updated on
Summary

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोमवारी १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.

पुणे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन सोमवारी १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी ९.०५ वाजता मुख्य ध्वजवंदन होणार आहे.

मुख्य सरकारी ध्वजवंदन समारंभात भाग घेता यावा, यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ दरम्यान ध्वजवंदनाचा अथवा इतर कोणताही सरकारी व निमसरकारी समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजवंदन कार्यक्रम साजरा करता येईल.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता आणि शनिवारवाडा येथे सकाळी ८ वाजता ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली.

ध्वजवंदनानंतर तंबाखूमुक्तीची शपथ

सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांसह सर्व ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक ध्वजवंदनानंतर तंबाखूमुक्तीची शपथ घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.