Pune Court To Swargate Metro Station: दीवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनवर राडा! भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक

Underground Swargate Metro Station: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्यामुळे काल भुयारी मेट्रो मार्गाचे उद्घाटन झाले नव्हते.
MVA Protest For Pune Court To Swargate Metro Station
MVA Protest For Pune Court To Swargate Metro StationEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्यामुळे काल भुयारी मेट्रो मार्गाचे उद्घाटन झाले नव्हते. दरम्यान आज दीवाणी न्यायालय स्टोशनवर महाविकास आघाडीने आंदोलन करत, शिवाजीनगर-स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी करत आहेत.

यावेळी विवध राजकीय पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकही आंदोलन स्थळी उपस्थितीत होते.

यावेळी "मेट्रो सुरू न करणाऱ्या मोदी आणि भाजपचा धिक्कार असो," अशा घोषणा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत होते.

दरम्यान 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडणार होता. मात्र, त्यादिवशी पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे या मार्गाचे उद्घाटन न झाल्याने सेवाही सुरू करण्यात आली नाही.

काम झाले असूनही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले नाही म्हणून प्रवासी सेवा बंद ठेवल्यामुळे शहरात संताप निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय मोरे यांनी पुढाकार घेत दिवानी न्यायालय मेट्रो स्टेशनवर धडक देत स्वारगेटपर्यंतची सेवा सुरू करण्याची मागणी केली.

MVA Protest For Pune Court To Swargate Metro Station
Swargate Metro Station Photos: आरारा... खतरनाक... अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्टेशनचे फोटो व्हायरल; उद्घाटनापूर्वी पाहा झलक

दरम्यान यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या मार्गाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा मार्ग ज्येष्ठांच्या हस्ते फित कापून सुरू करावा अशी मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी लवकरात लवकर हा मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.

26 तारखेचा दौरा रद्द झाल्यानंतर आता पंतप्रधान 29 सप्टेंबररोजी ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.

MVA Protest For Pune Court To Swargate Metro Station
Pune Metro: 'या' दिवशी करता येणार पुणेकरांना शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोनं प्रवास, PM मोदींच्या हस्ते व्हर्चुअली होणार लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.