दरोडा टाकून एकाच कुटुंबातील चौघांचा खून करणाऱ्याला २४ वर्षानंतर फाशी

२४ वर्षानंतर मुख्य सूत्रधाराला ठरवले दोषी; पुण्यातील १९९७ सालची घटना
२४ वर्षानंतर फाशी
२४ वर्षानंतर फाशीsakal
Updated on

पुणे : कल्याणीनगरमधील एका सोसायटीत दरोडा टाकून दोन सख्या बहिणी आणि त्यांच्या आई वडिलांचा खून करणाऱ्यास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला दिला.

भागवत बाजीराव काळे (वय ४७, रा. उस्मानाबाद) असे या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या मुख्य गुन्हेगाराचे नाव आहे. चौघांची हत्या केली तेव्हा काळे हा २२ वर्षांचा होता. त्याला २४ वर्षांनी दोषी ठरविण्यात आले आहे. रमेश जयकुमार पाटील (वय ५५), विजया पाटील (वय ४७), पूजा पाटील (वय १३) आणि मंजू पाटील (वय १०) यांचा खून करण्यात आला होता. याबाबत जुगराज हिम्मतलाल पालरेशा (रा. कोणार्क एनक्ल्युव्ह, बंडगार्डन रोड) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार १५ ते १६ मे ११९७ रोजी कल्याणीनगर येथील पिस्ट्रन टाऊनच्या चौथ्यामजल्यावरील सदनिकेत घडला होता.

२४ वर्षानंतर फाशी
पुणे : खोटे सोने तारण ठेवून बँकेची ३८ लाखांची फसवणूक

काळे व त्याचा साथीदार एका बांधकाम व्यावसायिकाकडे बिगारी म्हणून कामास होते. रमेश पाटील यांचे कुटुंब हुबळी येथून कल्याणीनगर येथे घटनेच्या चार दिवसांपूर्वीच भाडेतत्वावर राहण्यास आले होते. घरातील वस्तूंची हलवाहलव करण्यासाठी पाटील यांनी काळे याला बोलविण्यात आले. तर, या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली महिला घरकामासाठी त्याच्याकडे जात होती. घटनेच्या दिवशी काळे शिडी लावून पाटील यांच्या घरात घुसला.

त्यानंतर त्याने पाटील आणि त्यांच्या एका मुलीचा चाकूने वार करून खून केला व त्याचे मृतहेद ड्रेनेजमध्ये टाकून दिले. त्यानंतर विजया आणि दुसऱ्या मुलीचा खून केला. खून केल्यानंतर त्याने घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून गावाकडील शेतात लपवून ठेवला होता. चोरीला गेलेला ४६ लाख ९० हजारांचे ऐवज पोलिसांनी जप्त केला होता.

काळे १२ वर्ष होता फरार :

काळे व त्याच्या साथीदाराला येरवडा तुरूंगात नेत असताना त्यांनी पोलिस व्हॅनमधून पळ काढला. काळे १२ वर्ष फरार होता. काळे याने केलेला गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा आहे. त्याने दोन लहान जिवांचा निर्दयपणे खून केला आहे. काळे याने पैशांसाठी एका कुटुंबालाच संपविले. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. गुन्ह्यातील तपास अधिकारी श्यामराव धुलबुलू यांनी गुन्ह्यात कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना अचूक तपास करत आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

२४ वर्षानंतर फाशी
निलेश राणे शरद पवारांना टोला लगावण्याच्या नादात विसरले फॅक्ट

साथीदार पुरुष व महिला होती अल्पवयीन :

या प्रकरणात काळेचा साथीदार व मोलकरीण महिला यांनाही अटक करण्यात आली होती. २००४ साली न्यायालयाने संबंधित महिला ही गरोदर असल्याने तिला जन्मठेप तर त्याच्या साथीदाराला फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर १२ वर्षानंतर दोघांना अल्पवयीन ठरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.