Pune Crime: कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे नेमकं कारण?

Pune Crime Latest Update: रात्री उशिरा कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला.
Pune Crime: कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे नेमकं कारण?
Pune Crime: कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे नेमकं कारण?sakal
Updated on

Latest Pune News: कोंढवा पोलीस ठाण्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याप्प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी दिली. महेश भोईबार (वय २८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

यावेळी गुन्हा नोंद करुन घेण्यासाठी हिंदू संघटनेमार्फत आंदोलनही करण्यात आले. कोंढवा परिसरातील हिंदू संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती.

Pune Crime: कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे नेमकं कारण?
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

या रॅलीमध्ये संभाजी महाराज यांची बदनामी व जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे. जलील यांच्याच सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'छत्रपती संभाजीनगर-जालना' महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रूपीकरण केले होते.

सदरील घटना ही जलील यांनीच घडवून आणली असल्याचे म्हणत मंगळवारी (ता. १) विविध हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यानुसार रात्री उशिरा कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला.

Pune Crime: कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे नेमकं कारण?
काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी'

जनभावनेचा आदर करून जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावर असलेल्या संभाजी महाराजांच्या फलकाचे विद्रुपीकरण केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यानुसार तपास केला जाईल.-विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे

Pune Crime: कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे नेमकं कारण?
Pune News : खडकवासला धरणालगतच्या नदीपात्रात तरुणाचा बुडून मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.