Pune Crime News: विद्येचं माहेरघर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्यात अघोरी कृत्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत विवाहितेला स्मशानातील राख आणि हाडांचा चुरा जबरदस्तीने खावू घातल्याचं उघड झालं.
पुणे शहरातील धायरी भागात हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Crime News in Marathi)
घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी व मुल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केली. शिवाय आरोपी पती तसेच घरातील इतर जणांनी संगनमत करून विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ करून वारंवार मारहाण केली.
फिर्यादी महिलेचा विवाह ठरल्यानंतर तिच्या होणाऱ्या सासरच्यांनी सोने-चांदी द्यावे लागतील तसेच सगळ्यांना पंच तरांकीत हॉटेलमध्ये लग्नाचे आयोजन करावे लागेल अशी अट घातली होती. ही अट मान्य झाल्यानंतरच विवाह सोहळा पार पडला होता.
दरम्यान विवाह झाल्यानंतर काही दिवसातच महिलेला छळला सामोरे जावे लागले. घरातील अनेक जण अमावस्येला एकत्र येऊन काळे कपडे घालून काहीतरी रहस्यमय करत असल्याचे पीडित विवाहितेने पाहिलं.
घरात सुख शांती नांदावी आणि मूल व्हावं यासाठी प्रत्येक अमावस्येला अशीच पूजा होत असे. या पूजेमध्ये विवाहितेलाही सहभागी करण्यात आले.
एका अमावस्येला पतीसह सर्व मंडळींनी पीडितेला घराजवळील स्मशानभूमीत नेलं. स्मशानात असलेले प्रेताची हाडे आणि राख घरी आणली. तसेच त्याची पूजा केली. हे एवढ्यावर न थांबता त्यांनी स्मशानातील राख पाण्यात टाकून जबरदस्तीने पीडितेला पिण्यासाठी दिली. तर हाडांची पावडर करून तिला खाऊ घातली. या सगळ्या त्रासाला वैतागून अखेर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. याबरोबरच सासर चे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचे.
घरात भरभराटी व्हावी तसेच महिलेला मुलगा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून अघोरी आणि जादूटोणा करून पूजा देखील घातली होती.
या प्रकरणी पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव असे आरोपींची नावे आहेत.
आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात सशक्त दोषरोपपत्र सादर होणे गरजेचे आहे, असंही चाकणकर यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.