Wagholi Crime: लोणीकंद पोलिसांनी वाडेगाव येथे ओढयालगत असलेल्या गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टी वर कारवाई करत दारू बनविण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
यावेळी जेसीबीच्या साह्याने दारू बनवणाऱ्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. 38 हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन या ठिकाणी होते. त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये होती. तर गुन्हे शाखा युनिट सहाने तीन दारू विक्रेत्यांवर कारवाई करून २,७०,००० रुपये किमतीची दारू जप्त केली.
वाडेगाव हातभट्टी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हे शाखा युनिट सहाने बकोरी रस्ता परिसरातील तीन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला. हे विक्रेते ड्रीम संकल्प सोसायटी, आय व्ही इस्टेट सोसायटी परिसरात पत्र्याच्या शेड मध्ये दारू विकत होते. तसेच कार मध्येही दारू आढळून आली. चोखी धानी परिसरातील एका दारू विक्रेत्यांवर लोणी कंद पोलिसांनी कारवाई केली.
त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तर युनिट सहाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.