Pune Crime: डेक्कन परिसरात खळबळ! मद्यधुंद चालक अपघात करून आला, शुद्ध हरपल्याने थांबला अन् पोलिसांनी पकडलं

Pune Crime Deccan area: कारमध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. शिवाय, त्याने कार कोठेतरी ठोकली असल्याचं दिसत आहे.
pune crime
pune crime
Updated on

Pune Crime: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिऊन कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले आहे. चालक दारूच्या नशेत होता. गाडीने याआधीच कुठेतरी अपघात केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. कारमध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. शिवाय, त्याने कार कोठेतरी ठोकली असल्याचं दिसत आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.

गाडी सावरकर स्मारकसमोर उभी होती. येरवडा पोलीस ठाण्याचे ए पी आय यांच्या सावधानतेमुळे पुढचे अपघात टळले असच म्हणावं लागेल. डेक्कन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चालक शुभम गुप्ता याला ताब्यात घेतलं आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले तेव्हा तो शुद्धीवर नव्हता. त्याने पुढे गाडी चालवली असती तर आणखी अपघात झाले असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.