Pune Crime: डेक्कनच्या सायबर पोलिसांना ३० मोबाईल शोधण्यात यश, 'सीइआयआर’ प्रणालीची घेतली मदत!

Deccan Latest News: एका महिन्यात साडेपाच लाख रुपये किमतीचे ३० मोबाईल हस्तगत केले.
Pune police
Pune police sakal
Updated on

Latest Pune News: डेक्कन पोलिसांच्या सायबर पथकाने चोरीस गेलेल्या मोबाइलचा शोध घेत विविध भागातून साडेपाच लाख रुपये किमतीचे ३० मोबाईल जप्त केले. या तपासात पोलिसांनी दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावरील केंद्रीय उपकरणे ओळख नोंदवही (सीइआयआर) प्रणालीची मदत घेतली.

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून ‘सीइआयआर’ प्रणाली कार्यरत आहे. चोरीस गेलेल्या, हरवलेल्या मोबाइलबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर ‘सीइआयआर’ प्रणालीवर तो क्रमांक बंद करण्याची सुविधा आहे. तसेच, हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची स्थिती तपासण्यासाठी अर्ज करता येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.