ओतूर ता.जुन्नर येथील पोलीसांकडून नाकाबंदी दरम्यान दुधाची वाहतुक करणार्या पिकअप मध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा पकडून अंदाजे ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
ओतूर पोलीसांकडून आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नगर-कल्याण महामार्गावर खुबी येथे नाकाबंदी चालू असून त्यादरम्यान बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत दत्तात्रय शिवाजी काळे, वय ५०, रा.पिंपळवंडी ता.जुन्नर,पूणे यशवंत गुना रढे व रमेश पुनाजी कारभळ, दोघे रा.सावरणे ता. मुरबाड, जि. ठाणे, सुभाष बाबुराव नवले, रा. पारगाव, ता. जुन्नर, जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सरकारतर्फे फिर्याद पोलीस कर्मचारी संदीप भोते यांनी दिली आहे.