Pune Crime: रेल्वे स्थानकाजवळ १३ लाखांचा गांजा जप्त, वाचा पोलिसांनी कशी केली कारवाई

Latest Pune News: पुणे रेल्वे स्थानकाजवळ आगरकरनगर परिसरात गांजा विक्रीसाठी तिघेजण आल्याची माहिती पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली.
A digital board that remains closed even after the arrival of a passenger train at a railway station.
pune piolice chinmayesakal
Updated on

Latest Pune News: गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे रेल्वे स्थानकाजवळ आगरकरनगर परिसरात धडक कारवाई करून सुमारे ६१ किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे १३ लाख रुपये इतकी आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मानश कुमार स्वाईन (वय ३८, रा. हरीहरुपर, जि. नयाघर, ओडिशा), लालमोहन फ्रान्सिस बिर (वय ३४, रा. अतंराबा, जि. गजपती, ओडिशा) आणि श्रीकांत अभिमन्यू बिरा (वय ३७, रा. मोहना जि. गजपती, ओडिशा) अशी आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.