Lonikand News: लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील, मोक्यातील व तीन वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले.
ऋग्वेद जालिंदर वाळके ( वय 23, रा. पेरणे टोलनाक्याजवळ, पेरणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळके हा घरी येणार असल्याची माहिती ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार या पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाली. पथक तयार करून त्याच्या घरी जावून पाहणी केली असता तो घरी आढळून आला.