Pune Crime : टेम्पोसह 56 लाखाचा गुटखा पकडला, जिल्हा गुन्हेशाखा व राजगड पोलिसांची कारवाई

पांढरया व सुतळीच्या पोत्या मध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याचे अढळुन आले.
Pune Crime
Pune Crimesakal
Updated on

Pune Crime - किकवी मोरवाडी ता.भोर गावच्या हद्दीत रस्त्याच्या चालु असलेल्या कामा लगत उभा राहीलेल्या टेम्पो मधुन सुमारे 55 लाख 79 हजार 600 रुपयांचा प्रतिबंधीत सुंगधी तंबाखुचा गुटखा मिळुन आल्याने सुमारे 18 लाखाच्या टेम्पोसह 73 लाख 85 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन या प्रकरणी चौघांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे तर एकास अटक करण्यात आली आहे.

Pune Crime
Pune Crime : मैत्रिणीला धक्का लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाणीत मृत्यू , दोघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

किकवी मोरवाडी येथील रस्त्यालगत थांबलेल्या टेम्पो मधुन गुटख्याचा उर्ग वास येत असुन त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा असण्याची शक्यता असल्याची माहीती जिल्हा गु्न्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाल्यावर त्यांनी जिल्हा गुन्हेशाखेच्या पथकासह राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ व पोलिस कर्मचारयांसह सदर थांबलेल्या टेम्पो (क्र.एम एच 07 ऐ जे 2943)ची तपासणी केली.

असता त्या मध्ये पांढरया व सुतळीच्या पोत्या मध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याचे अढळुन आले या वेळी टेम्पो समवेत असलेला व्यक्ती ऋत्विक दशरथ मोरे वय 24 रा.मोरवाडी ता.भोर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा टेम्पो व त्यातील गुटखा सुधाकर कल्याण पानसरे व दिनेश कल्याण पानसरे दोघे रा.शिवरे यांचा असुन पुणे येथे नजीम (पुर्ण नाव पत्ता नाही) या व्यक्तीस विकण्यासाठी चालवल्याचे समजले.

पोलिसांनी टेम्पोची कसुन चौकशी केली असता टेम्पोचा क्रमांक एम एच 07 ऐजे 2943 शिवाय क्र.एम एच 12 टि व्ही 8247 या नंबरच्या पिवळ्या रंगाच्या दोन नंबर प्लेट टेम्पो मध्ये मिळाल्या आहेत टेम्पो ला बोगस नंबर प्लेट लावुन या गुटख्याची वाहतुक होत असल्याचे या वेळी निष्पन्न झाले.

Pune Crime
Kokan Railway : मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

पोलिसांनी टेम्पो मधील विमल,रजनीगंधा व सुगंधी तंबाखु गुटख्याचा माल एकुण किंमत रुपये 73 लाख 85 हजार 400 रुपये,वाहतुक करणारा टेम्पो किंमत 18 लाख रुपये,टेम्पो मध्ये अढळलेली नंबर प्लेट किंमत एक हजार रुपये व टेम्पो मधील मोबाईल किंमत पाच हजार रुपये असा एकुण माल किंमत 73 लाख 85 हजार 400 रुपये पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतला असुन टेम्पो समवेत असलेला ऋत्विक दशरथ मोरे यास अटक केली आहे तर इतर सुधाकर पानसरे,दिनेश पानसरे व खरेदीदार नजीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
Pune : पुरंदरमध्ये टँकर मागणीत लोकांप्रमाणे पशुधनही मोजून प्रस्ताव द्या

या प्रकरणी जिल्हा गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असुन पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर पुढील तपास करत आहेत.

चौकटीसाठी (जप्त केलेला गुटखा ठेवायला जागा नाही) राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर गेले काही दिवसा पासुन धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला गेला आहे.

परंतु राजगड पोलिस ठाण्यास पुरेशी जागा नसल्याने जप्त केलेला गुटखा कुठे ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे काही दिवसापुर्वी जप्त केलेला गुटखा ट्रकसह चोरट्यांनी गायब केला होता त्यातील निम्मा गुटखापोलिसांनी परत हस्तगत केला होता या घटनेच्या पार्श्वभुमीवर जप्त केलेला गुटखा सुरक्षित ठेवायचा कुठे हा प्रश्न राजगड पोलिसां समोर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.