Pune Crime : MPSC पास तरुणीच्या मृत्यूप्रकरणात खळबळजनक खुलासा! राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता मृतदेह

संबधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला.
Pune Crime
Pune Crime sakal
Updated on

Pune Crime - वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेली नगर जिल्ह्यातील तरुणी दर्शना पवार हीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

त्यात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहेत. संबधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे. त्यामुळे वेल्हे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.

Pune Crime
Mumbai : रेल्वेचे ईमर्जन्सी ब्रेक कसे दाबायचे ? लोको पायलटच्या ट्रेनिंगसाठी CSMT मध्ये खास मशीन

दर्शना दत्ता पवार (वय.२६) असे युवतीचे नाव असून मुळ गाव, संजीवनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कॉलनी ,सहजानंदनगर ,ता.कोपरगाव, जि.अहमदनगर असे असुन तिची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर नव्याने निवड झाली होती ती एमपीएससी परीक्षेत राज्य सहावी आली होती.

दर्शना पुण्यातून १२ जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल होती.दरम्यान या घटनेबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

Pune Crime
Pune : शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता, संख्याशास्त्राची ओळख आणि उपाययोजना करणे गरजेचे

याबाबत वेल्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार

९ जून रोजी दर्शना ही पुण्यातील एका खाजगी अकॅडमी मध्ये सत्कार स्विकारण्यास आली होती .दुसर्‍या दिवशी १० जून रोजी दर्शनास दिवसभर घरातील व्यक्तींकडून फोन करीत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीचे फोन तीने उचलले नाहीत दरम्यान मुलीच्या वडिलांनी १२ जून रोजी पुणे येथे येऊन अकॅडमी चौकशी केली असता मुलगी दर्शना ही तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे यांच्यासोबत

Pune Crime
Mumbai : रेल्वेचे ईमर्जन्सी ब्रेक कसे दाबायचे ? लोको पायलटच्या ट्रेनिंगसाठी CSMT मध्ये खास मशीन

सिंहगड व राजगड किल्ले फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुलीचा शोध चालू होता दरम्यान रविवार (ता.१७) जून रोजी किल्ले राजगड च्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला होता.

दरम्यान शिवविच्छेदनातून तिच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे आढळून आल्यानंतर तसेच पोलिसांच्या एकंदरीत झालेल्या तपासानुसार दर्शना हिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली असून ती रवाना झाली आहेत.

या घटनेबाबत पुणे ग्रामीणचे अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.