Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना! भावाच्या हत्येचा बदला म्हणून तीन अल्पवयीन तरुणांनी केली एकाची हत्या

एकाचे वय 17 वर्ष 11 महिने आणि 28 दिवस. तीनही आरोपी अल्पवयीन असले तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Pune Crime - सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडलेल्या खूनाच्या गुन्ह्याची चोवीस तासांच्या आत उकल करण्यात हवेली पोलीसांना यश आले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून तीन अल्पवयीन आरोपींनी राहुल चंद्रकांत आटोळे (वय 36) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Crime News
Pune News : कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ उठविण्याची मागणी; रस्त्यावर अनेक व्यावसायिक दुकाने

तीन पैकी दोन अल्पवयीन आरोपींना हवेली पोलीसांनी वेल्हे येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.23 मार्च 2022 रोजी नांदेड फाट्याजवळ एका भंगाराच्या दुकानात बसलेल्या सराईत गुन्हेगार मारुती ढेबे (वय 20) याची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. यामध्ये नांदेड फाट्याजवळील गोसावी वस्ती येथील आरोपी होते.

Crime News
Mumbai Crime : वडिल म्हणाले... पोरांन केली आत्महत्या; काय होतं कारण ?

मारुती ढेबे याची हत्या झाल्यापासून त्याचा बदला म्हणून लहान भाऊ गोसावी वस्तीतील एकाला तरी संपवायचे असे म्हणत होता. त्यानुसार दि.11 जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन अल्पवयीन आरोपींनी नांदेड फाट्याजवळील कालव्यालगत राहुल आटोळे याचा धारदार शस्त्राने वार करुन खून केला व मृतदेह झुडपात फेकून दिला. काल दि. 12 जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती.

Crime News
Mumbai Crime : वडिल म्हणाले... पोरांन केली आत्महत्या; काय होतं कारण ?

खून झालेल्या राहुल आटोळे याचा अगोदर कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नव्हता, त्यामुळे त्याला नेमके कोणी व का मारले हे स्पष्ट होत नव्हते. रात्री उशिरा हवेली पोलीसांना हा खून तीन अल्पवयीन तरुणांनी केल्याची खबर मिळाल्यानंतर हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले,

पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश राणे, विलास प्रधान,अशोक तारु, पोलीस नाईक राजेंद्र मुंढे, संतोष भापकर यांनी वेल्हे येथे लपून बसलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनीही आरोपी ताब्यात घेण्यासाठी हवेली पोलीसांना मदत केली.

Crime News
Mumbai News : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेले पाच मुले बुडाली, एकाला स्थानिकांनी वाचवलं

मित्राला मेसेज केला, 'बघ आपून काय केलंय'..रात्री नऊ वाजता राहुल आटोळे याचा खून केल्यानंतर आरोपी मृतदेह झुडपात फेकून निघून गेले. रात्री दीड वाजता पुन्हा घटनास्थळी जाऊन आरोपींनी मृतदेहाचे व्हिडिओ काढले व मित्राला इन्स्टाग्रामवर पाठवले. तसेच खाली मेसेजही केला की,'बघ आपून काय केलंय'. यावरून आरोपींनी जाणीवपूर्वक दहशत पसरविण्यासाठी अत्यंत निर्घृणपणे हा खून केल्याचे दिसून येत आहे.

Crime News
Mumbai Crime : वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलेचा खून, स्टीलच्या ताटाने हल्ला

एकाचे वय 17 वर्ष 11 महिने आणि 28 दिवस!...... तीनही आरोपी अल्पवयीन असले तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील एका आरोपीचे वय तर 17 वर्ष 11 महिने आणि 28 दिवस आहे, म्हणजेच गुन्हा करण्याच्या दिवशी तो केवळ दोन दिवसांनी अल्पवयीन होता.

अत्यंत निर्घृणपणे खून करुनही अल्पवयीन असल्याने कायद्याचा आधार घेऊन सुटता येईल याची पूर्ण जाणीव या आरोपींना असल्याचे दिसून येत आहे."आरोपींनी खून केल्यानंतर कोणताही पूरावा मागे ठेवला नव्हता त्यामुळे तपासाचे मोठे आव्हान होते.

Crime News
Mumbai Crime : वडिल म्हणाले... पोरांन केली आत्महत्या; काय होतं कारण ?

तपासासाठी चार पथके रवाना करण्यात आले होते. रात्री उशिरा गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन पैकी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी खूनाची कबुली दिली असून अधिक तपास करण्यात येत आहे."

सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()