Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पुण्यात निर्घुण हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात हडपसर गुलटेकडी परिसरात मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सुनील सरोदे या तरुणाची गुंडानी हत्या केली आहे. सुनील सरोद हा डायस प्लाट परिसरात राहतो. मोक्यातील जामिनावर सुटलेले रोहन कांबळे, शिवशरण कांबळे यांनी त्याची हत्या केली असल्याचं कळत आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.