Pune Crime News : धक्कादायक! आधी पत्नीच्या डोक्यात घातला दगड अन्.... नंतर स्वत: उचललं टोकाचं पाऊल

पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २५) सायंकाळी एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात घडली.
Pune Crime News
Pune Crime Newssakal
Updated on

खडकवासला : पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २५) सायंकाळी एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात घडली.

सोमनाथ सखाराम वाघ (वय ५३, रा. वारजे) आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी सोमनाथ वाघ याच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसूफ शेख यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती- पत्नी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता िफरायला जातो म्‍हणून दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक-बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. ते दोघे नेहमीप्रमाणे वॉक करण्यासाठी गेले. त्‍यावेळी अचानक झालेल्‍या वादातून त्‍याने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. दरम्यान, सकाळी अकरा वाजून गेले तरी ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध घेतला.

Pune Crime News
Pune Weather : पुण्यात थंडी वाढली ; किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत

सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात दिसली. त्या परिसरात शोध घेतला असता आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती उत्तमनगर पोलिसांना कळवली. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुंवर, पोलिस निरीक्षक युसूफ शेख तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक अमृता चौरे, सहाय्यक फौजदार प्रसाद जोशी, कर्मचारी धनंजय बिटले‌ घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.