Pune Crime News: पुण्यातील विविध परिसरात रात्री अपरात्री वाहने अडवून लूट करणे, महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावणे, किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेते, टपरीवाले आदींना कोयता दाखवून दहशत माजवीत, जखमी करीत लुबाडणूक करणे आदी प्रकार गेली काही महिन्यांपासून परिसरात वाढले आहेत.
यामध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळ्या सक्रीय आहेत "कोयता गँग' च्या नावाखाली या टोळ्यांनी दहशत माजविली आहे. मात्र आता पुणे पोलिस या गॅंगच्या मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शनमुड मध्ये आल्याचे पाहिला मिळत आहे. दरम्यान 28 डिसेंबर रोजी पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज या भागात दोन तरुणांनी कोयता घेऊन दहशत माजवली होती.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि पाठलाग करून त्या दोन्ही तरुणांना पकडायचा प्रयत्न केला मात्र यातील मुख्य आरोपी करण दळवी हा पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाला होता.
मात्र पुणे पोलिसांनी तपास करत आरोपी करण दळवीला पुणे पोलिसांनी बीडमधून अटक केली आणि इतकाच काय तर जिथे कोयता फिरवत दहशत माजवली तिथूनच त्याची धिंड काढली. या कोयता गँगची दहशत मोडीस काढण्यासाठी या आरोपीची धिंड काढण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.