पुण्यातील खडकी येथे शुक्रवारी रात्री नियमभंग केल्याने एका वाहतूक हवालदाराला कारच्या बोनेटवर सुमारे ५० मीटरपर्यंत ओढत नेलं. खडकी पोलिस ठाण्यासमोरील चर्च चौकाजवळ ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कारचा चालक सूरज जाधव (२९, रा. देहू रोड) याला अटक करण्यात आली आहे. गणेश शिवाजी रबडे असं वाहतूक हवालदाराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.
हा कॉन्स्टेबल खडकी अंडरपासवर ड्युटीवर असताना त्याला एक एक्सेंट कार लेन ओलांडून जाताना दिसली. हे लक्षात येताच, त्याने कार थांबवण्याचा प्रयत्न केला पण ड्रायव्हर थांबला नाही, उलट त्यालाच खाली पाडण्याचा प्रयत्न केला.
“स्वत:ला वाचवण्यासाठी रबडेने कारच्या बोनेटवर उडी मारली आणि त्याला पकडता येईल अशा वस्तूला पकडलं. तो ओरडत राहिला तरीही चालकाने त्याला ओढत नेलं. ही घटना ज्यांच्या लक्षात आली त्यांनी मध्यस्थी करत चालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडलं. रबडेला कारमधून फेकण्यात आलं आणि त्याच्या डाव्या घोट्याला आणि दोन्ही गुडघ्याला दुखापत झाली,” असं पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.