पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलांचा चोरीचा प्रयत्न

मोबाईलवरील पबजी गेमच्या आहारी गेलेल्या पुणे शहरातील सुशिक्षित घरातील दोन अल्पवयीन मुलांनी चोरीचा बनाव केला.
PUBG Effect
PUBG EffectSakal
Updated on

पारगाव : मोबाईलवरील पबजी गेमच्या आहारी गेलेल्या पुणे शहरातील सुशिक्षित घरातील दोन अल्पवयीन मुलांनी पारगाव (ता. आंबेगाव) येथे आज सोमवारी भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्याच्या बहाण्याने एका घरात घुसुन पाणी देणार्याच्याच डोक्यात बॅट घालून जबरी चोरीचा प्रयत्न केला परंतु बॅटचा ठोका डोक्यात न लागता पाठीला लागल्याने जखमी झालेल्या कुंडलिक खंडू लोंढे यांनी आरडा ओरडा केल्याने हे दोन्हीही अल्पवयीन मुले जवळील उसाच्या शेतात पळाली गावातील तरुणांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर दोन्ही मुलांना शेतातून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

मंचर शिरूर रस्त्यालगत पारगाव पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या विमा प्रतिनिधी कुंडलिक लोंढे यांच्या घरात दोन मुले पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसले. हातात क्रिकेट ची बॅट असल्याने श्री. लोंढे यांना वाटले हि मुले क्रिकेट खेळण्यासाठी चालली असतील तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी आली म्हणून श्री. लोंढे यांनी पाणी पिण्यासाठी देऊन मागे वळले असता त्या मुलांनी पाठीमागून श्री. लोंढे यांच्या डोक्यात बॅट घातली श्री. लोंढे यांनी तो ठोका चुकवला परंतु पाठीत बॅट लागल्याने मुका मार लागला.

PUBG Effect
Video: उड़ ने दो मिट्टी को..; शिक्षणमंत्र्यांनी घेतली योगींची शाळा

श्री. लोंढे यांनी आरडा ओरडा केल्याने आपला प्लॅन फसला. असल्याची खात्री होताच दोन्ही मुलांनी तेथून पळ काढून शेजारच्या ऊसात पळाले. आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक तात्काळ धावतपळत आले. संदीप घुले, देवा दातखीळे, अनिल शेवाळे, शंकर देवडे, पांडुरंग देवडे, सोनू लोंढे, सतीश लोखंडे या तरुणांनी ऊसाच्या शेतात शोध घेतला लपून बसलेल्या दोन्ही मुलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांनी आणलेल्या स्कुटीच्या डिकीत मिरची पावडर, कटर, हातमौजे सापडले ही घटना समजताच सहाय्यक पोलीस फौजदार कैलास कड, पोलीस जवान अजित पवार, होमगार्ड स्वप्नील जगदाळे, कमलेश चिखले यांनी तात्काळ पारगाव येथे जाऊन दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करत आहे.

सदर दोन्ही मुले ही 15 व 16 वर्षाच्या असून यातील एकाचे वडील पोलिस खात्यात आहे तर दुसर्‍याचे आरोग्य खात्यात कार्यरत आहेत एक दहावीत तर दुसरा अकरावीत शिकत पुणे शहरातून ७० ते ८० किलोमीटर अंतरावरील पारगाव येथे स्कुटीवर येऊन पुन्हा पुण्याला पसार व्हायचे आहे मौजमस्ती करण्यासाठी चोरीचा उद्देश असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.