Pune Crime News : पुण्यात पोलिसांचा वचक संपलाय का? पाणीपुरीचे पैसे मागिल्याने केला चाकू हल्ला

शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
attack
attack Sakal
Updated on

Pune Crime News : पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघांनी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजेंद्र जाठम यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

attack
Economic Survey 2022-23 : अर्थमंत्र्यांकडून सर्वेक्षण सादर; इतका असणार GDP

पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघांनी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील शनिवारवाड्यासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रोडवर ही घटना घडली आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार रविवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडला.

attack
Pune News : धक्कादायक! पुण्यातील बालसुधारगृहातून कोयता गँग फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे ८ वाजताच्या सुमारास, २ तरुण रिक्षा मधून शनिवारवाडा समोर असलेल्या शिवाजी रोड या ठिकाणी एका पाणीपुरी स्टॉलवर आले. त्यांनी पाणीपुरी विक्रेत्याला शिवीगाळ करुन "एक पाणीपुरी दे और तू अपने भाई को बुला" असे म्हणले.

यावर कुठलाही वाद न घालता विक्रेत्याने त्यांना पाणीपुरी दिली. त्यानंतर पाणीपुरीचे पैसे द्या असं विक्रेता म्हणताच" आम्हाला पैसे कसे मागतो" असे म्हणत दोघांनी खिशातील चाकू काढून विक्रेत्याच्या हाताच्या कोपऱ्यावर आणि दंडावर वार केले.

attack
Budget Session 2023 : एकही गरीब नसलेला देश बनवणं हे ध्येय - राष्ट्रपती

या चाकू हल्ल्यात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी झाला असून, जखमी अवस्थेत त्याने थेट पोलीस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंडात्मक कलम ३२३,३२६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.