काळेबोराटेनगर परिसरात चोरी-लूटमारीमुळे नागरिकांत घबराट

पोलिसांची गस्त वाढवावी लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
CRIME
CRIMEsakal
Updated on

उंड्री : काळेबोराटेनगरमध्ये भरदिवसा चोऱ्या-लूटमारीच्या घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने सीसीटीव्ही बसवावेत. तसेच पोलीस खात्याने गस्त वाढवावी, नाकाबंदी लावून चोरट्यांवर वचक निर्माण करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.नागरिकांनी सांगितले की, काळेबोराटेनगर या रस्त्यावरील रेल्वे भुयारीमार्गातून जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नाही. त्यामुळे भरदुपारी आणि रात्री-अपरात्री एकट्या दुकट्या व्यक्तीला अडवून लूटमार करणे, मोबाईल चोरी, महिलांच्या हातातील पर्स आणि मोबाईल हिसकावून नेणे, महिलांची छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या बाजूला झाडीझुडपी मोठ्या प्रमाणावर असून, त्या ठिकाणी प्रेमीयुगुलांचे अश्लिल चाळे सुरू असल्याचे प्रकार होत आहेत.त्यामुळे स्थानिक महिलांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेल्वे भुयारी मार्ग रस्त्यावर मागिल काही महिन्यापूर्वी पेट्रोल पंपावरील रोखपाल पैसे भरण्यासाठी बँकेत जात असताना त्याला अडवून साडेनऊ लाख लुटल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर मागिल पंधरा दिवसांपूर्वी दुपारी चारच्या सुमारास मजुराचे पाकिट आणि मोबाईल चोरून नेला, त्याची तक्रार देण्यासाठी गेला.

CRIME
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने शिवनेरी दुमदुमली

त्यानंतर तो महंमदवाडी पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रारही दाखल करून घेतली. दोनच दिवसांपूर्वी पादचारी महिलेच्या हातातील पर्स आणि मोबाईल चोरट्यांनी पळवून नेल्याची तक्रार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. तरीसुद्धा पोलिसांनी अद्याप त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे स्थानिक महिला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा घटना वारंवार होतात, आमच्याकडे स्टाफ कमी आहे, आम्ही कुठे कुठे लक्ष देणारे सांगून तक्रार देणाराला हुसकावून लावतात. त्यामुळे चोरीच्या घटना झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी नागरिक पोलिसांकडे जात नाहीत.

फोर्स संघटनेचे अध्यक्ष वैभव माने म्हणाले की, काळेबोराटेनगर आणि रेल्वे भुयारी मार्ग परिसरात पालिका प्रशासनाने सीसीटीव्ही बसवावेत, तसेच पोलिसांची दिवसाही गस्त वाढवावी, नाकाबंदी असली पाहिजे. नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक नागरिक खंडेराव जगताप म्हणाले की, सर्वसामान्यांची लूटमार झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास केला पाहिजे. मात्र, पोलिसांकडून तक्रार दाखल करून न घेता तक्रार देणारालाच प्रश्न विचारून भंडावून सोडत असल्याची बाब पोलीस खात्याला अशोभनीय आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाते. पोलिसांची गस्त सुरू आहे. नागरिकांनी रात्री-अपरात्री उशिरा एकटाने फिरू नये. पोलिसांबरोबर नागरिकांनीही स्वतः दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.