चाकण -आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी फाटा ता.खेड येथील हिताची कंपनीचे एटीएम मशीन फोडून स्कॉर्पिओ मध्ये साहित्य भरून रोख दहा लाख 52 हजार रुपये रक्कम घेऊन स्कार्पिओ मधून पाच ते सहा चोरटे पळून जात असताना चोरट्यांचा महाळुंगे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला.त्यानंतर चोरटे स्कार्पिओ जीप सोडून पळाले. पाच ते सहा चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पिंपरी -चिंचवड चे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "हा प्रकार रात्री दोनच्या सुमारास घडला. चाकण व महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीवरील बिरदवडी फाटा येथील हिताची कंपनीचे एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम चोरली जात असल्याची माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे अंमलदार पोलीस हवालदार होळकर यांना मिळाली.