Pune : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी

वडगाव शेरी, अंकुश बनसोडे या 13 वर्षीय मुलाचे निधन
वडगाव शेरी
वडगाव शेरीesakal
Updated on

वडगाव शेरीतील महावितरणाच्या उघड्या डीपीचा (रोहित्र) विजेचा धक्का लागून गंभीरित्या भाजलेल्या तेरा वर्षीय मुलाचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे. मुलाचे निधन झाल्यामुळे आणि अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना असून जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

निधन झालेल्या मुलाचे नाव अंकुश खंडू बनसोडे (वय १३, रा.गणेशनगर) असे आहे. ही घटना एप्रिल महिन्यात (ता. २४) रोजी घडली होती.आनंद पार्क बस स्टॉपलगत महावितरणचा डीपी उघड्यावर आहे. अंकुश त्या ठिकाणी गेला असता रोहित्रातील विजेचा धक्का लागून तो गंभीर भाजला होता.

वडगाव शेरी
Pune Road : रस्ते जोडा अन् कोंडी फोडा! शहरातील ३८ मार्ग प्राधान्याने करणार विकसित

त्यावेळी बसस्थानकावर उभे असलेले अँड. सतीश माने, राहुल दळवी, प्रकाश धोत्रे, दयानंद कांबळे यांनी प्रसंगावधान राखून खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल करून उपचार उपलब्ध करून दिले होते. ससून येथील उपचारानंतर अंकुश ला घरी सोडण्यात आले होते आणि त्याच्यावर कार्यकर्त्यांच्या आर्थिक सहाय्यातून घरूनच उपचार सुरू होते.

मात्र काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती पुन्हा खालावली. उपचारासाठी पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे रविवारी पहाटे दुर्दैवी निधन झाले.बनसोडे कुटुंबीय वडगाव शेरी परिसरात मोलमजुरी करून पोट भरतात. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. हाताशी आलेल्या मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे बनसोडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वडगाव शेरी
Pune Water : पुणे महापालिकेने मागितले २०.९० टीएमसी पाणी

महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंकुशची गेले तीन महिने मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु या काळात महावितरणचा कोणीही अधिकारी बनसोडे कुटुंबीयांकडे फिरकला नाही किंवा आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - राहुल दळवी, ॲड. सतीश माने, दयानंद कांबळे ( स्थानिक रहिवासी आणि अंकुशला उपचारात मदत केलेले कार्यकर्ते)

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे उघड्या वीज वाहक तारेला स्पर्श होऊन अंकुश बनसोडे या मुलाचे दुर्दैवी निधन झाले. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे. - आशिष माने ( अध्यक्ष वडगाव शेरी नागरिक मंच)

वडगाव शेरी
Pune : बेकायदेशीर मांगुर मासा वाहतुकीवर कारवाई; जवळपास 2 टन मांगुर मासे केले नष्ट

सदर घटना दुर्दैवी आहे. या घटनेविषयी विद्युत निरीक्षकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्या अहवालात जर महावितरणचा अधिकारी दोषी आढळला तर त्यावर कारवाई केली जाईल आणि सदर मुलाला आर्थिक मदत केली जाईल. - अशोक जाधव ( कार्यकारी अभियंता, नगर रस्ता विभाग)

वडगाव शेरी :

उपचार करून घरी परतल्यानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केक कापून अंकुश बनसोडेचे घरी स्वागत केले होते. मात्र बनसोडे कुटुंबीयांसाठी हा आनंद क्षणिक ठरला. आज रविवारी सकाळी त्याचे दुर्दैवी निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.