Pune Crime: पुणे महिलांसाठी सुरक्षित नाहीच? सात महिन्यात तब्बल 'इतक्या' बलात्काराच्या घटना

Pune Crime rate: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असा लौकिक पुण्याचा आहे. पण, काही महिन्यांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहे.
crime
crimeesakal
Updated on

Pune Crime News: पुण्यामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज काही प्रकरणे समोर येत आहेत. याच प्रकरणी पुण्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात सात महिन्यात 265 बलात्काराच्या घटना तर 450 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असा लौकिक पुण्याचा आहे. पण, काही महिन्यांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहे. दररोज काही घटना कानावर पडत आहेत. पुणे गुन्हेगारी सिटी होत आहे का? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. पुण्यात या वर्षातील फेब्रुवारी पासून सात महिन्यात 265 बलात्काराच्या आणि 450 विनयभंगाची गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

crime
Pune Crime: पुन्हा एकदा महिला अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला! पुण्यात बोपदेव घाटातून तरुणीचे अपहरण अन् ....

महिला व मुला मुलींच्या सुरक्षेतेसाठी पुणे पोलिसांकडून दामिनी पथक,पोलीस काका,पोलीस दीदी आधी उपक्रम राबवले जात आहेत.तरीही दर महिन्याला बलात्काराच्या सरासरी 38 तर विनयभंगाचे 65 गुन्ह्याची पोलिसांकडून नोंद आहे. ही धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. त्यामुळे पुणे सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे.

crime
Pune Crime: कोर्टामध्ये नराधम ढसाढसा रडला; वानवडी अत्याचार प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

पुण्यातील अत्याचाराच्या घटना

महिना बलात्कार विनयभंग

ऑगस्ट ३७ ६०

जुलै ३९ ४४

जून. ३५ ६२

मे ३७ ६५

एप्रिल ३६ ६६

मार्च ३९ ८५

फेब्रुवारी ४२ ६८

एकूण २६५ ४५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.