Crime News : भर रस्त्यात शाळकरी मुलींचा राडा; केसांना धरून ओढत मारहाण

कंपनी...गँगस्टर...रील्स मधून प्रतिमा बनविण्याच्या नादात अडकलेल्यांना शिक्षिकेने आणले मार्गावर
pune crime school girl violence on road girls group attack on school girl social media police
pune crime school girl violence on road girls group attack on school girl social media policeesakal
Updated on

कोथरुड : चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवला. केसांना धरुन ओढत नेत मारहाण केली. या भांडणात टारगेट झालेल्या मुलीचे कपडेही फाटले. या घटनेचे चित्रिकरण करुन समाजमाध्यमावर टाकला. त्याचे शिर्षक होते, राडा....कंपनी...गँगस्टर.. विषय करायचा नाय लई.

किशोरवयीन मुलींनी केलेला हा प्रकार धक्कादायकच होता. स्वतःला रावडी हीरो, गँगस्टरच्या रुपात पहावेसे वाटणे व त्याप्रमाणे वर्तन करण्याचा त्यांचा प्रयत्न या मुलींच्या पालकांना देखील माहिती नव्हता. सकाळी कामावर जायचे व रात्री घरी यायचे. यामध्ये मुलांशी संवादच हरवलेला. वाढीच्या वयात योग्य दिशा दर्शन न मिळाल्यामुळे नीरंकुश असलेली ही मुले भरकटण्याची शक्यताच जास्त.

तसेच या मुलींबाबत घडले होते. परिसरातील गुंडगीरी, डॅशिंगपणा. ऐय्याशीचे नकळत निर्माण झालेले आकर्षण, याला खतपाणी भेटले ते मोबाईलवरील मायाजालाचे. समाजमाध्यमे व गेमच्या भावविश्वात अडकलेली मुले त्यातील पात्र स्वतःत पाहू लागली. त्यांची भाषा व वर्तनातील बदल समजायला पालकांनी कुटूंबासाठी वेळतर द्यायला हवा ना. त्याचाच हा परिणाम असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कोथरुड पोलिस मधील दामिनी पथकाच्या रुपाली घावटे म्हणाल्या की, या अल्पवयीन मुली गँग बनवणे, वाईट प्रवृत्ती, दादागीरी अशा गोष्टींना बळी पडत चालल्या होत्या. या मुलींना चौकीत बोलावून गुन्ह्याचे परिणाम समजावून सांगितले. तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांनी अशा गोष्टी पुन्हा करु नयेत म्हणून समज दिली व त्यांच्याकडून तसे लिहून घेतले.

जीला दोन वेळा मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. मारहाणीत आपल्या श्रवणयंत्राला हानी पोहचेल म्हणून ती यंत्र घरीच ठेवत होती. भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलीला पाहून आईचेही मन गलबलले. वडीलांनी इन्स्टावर आपल्या मुलीला मारहाण होत असल्याचा व्हीडीओ पाहिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी शाळेत भेट घेवून मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

मारहाण करणा-या मुलींशी चर्चा केली असता समजले की, या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे, समाजमाध्यमावर फॉलोअर्स वाढवणे यात त्या व्यस्त होत्या. गैरसमजुतीतून या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्टावर व्हीडीओ टाकण्यामागे आपली इमेज बनवणे हा त्यांच्या मनातील सुप्त हेतू उघड झाला.

भारती विद्यापीठ कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या जाधव यांनी यामध्ये पुढाकार घेत शिक्षण मंडळाच्या विशेष साधन व्यक्ती पदावर असलेल्या स्मीता सुर्यवंशी व विशेष शिक्षिका राधा बिरादार यांच्या सहकार्यातून या दिव्यांग मुलीशी संवाद साधला. तीच्या मनातील भिती दूर करणे महत्वाचे होते. शाळेत जायचेच नाही असे तीने ठरवले होते. ज्या मुलींनी तीला मारहाण केली त्यांना मार्गावर आणणेही तितकेच महत्वाचे होते. सर्व मुलींशी, पालकांशी स्वतंत्रपणे चर्चा करत या विषयावर सविस्तर माहिती घेण्यात आली. पोलिसांच्या सहकार्याने मुलींचे समुपदेशन करत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करुन देण्यात आली.

स्मीता सुर्यंवंशी म्हणाल्या की, या दिव्यांग मुलीच्या मनातील भिती घालवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. मारहाणीत सहभागी मुलींना आपल्या चुकीची जाणीव करुन दिली आहे. गँगस्टर नव्हे तर समाज पुढे नेणारे नेतृत्व बना, अभ्यास करुन स्वतःची प्रगती करत सकारात्मक व्यक्तीमत्व घडवा असे त्यांच्या मनावर बिंबवले आहे. आता या मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मुख्याध्यापिका विद्या जाधव म्हणाल्या की, किशोरवयामध्ये मुले स्वतःचे व्यक्तीमत्व घडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या सभोवताली जे चालले असते त्यातील आवडत्या व्यक्तीमत्वांची निवड करतात. समाजमाध्यमातील आभासी व्यक्तीमत्वे, सेलिब्रेटी यांचे त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होते. यातून ते आपला मार्ग निवडतात. पालक, शिक्षक, समाज प्रतिनिधीत्व करणारे यांनी नव्या पिढीच्या वाटचाली बाबत जागृत असणे आवश्यक आहे.

हे करायला हवे

  • कुटूंबातील सर्व सदस्यांनी टीव्ही बंद करुन रात्रीचे जेवण गप्पागोष्टी करत एकत्र घ्यावे.

  • जेव्हा शक्य असेल तेव्हा दिवसातून काही वेळ आपल्या मुलांसाठी अवश्य द्यावा.

  • पालकांनी नियमित शिक्षकांशी संपर्क ठेवून पाल्याच्या प्रगतीचा आढावा घ्यावा.

  • मुलांची दफ्तरे, वह्यावरील नोंदी, मोबाईलवरील क्रीया (अँक्टीव्हीटी) यांचे अवलोकन करावे.

  • गरज पडल्यास शिक्षक, समुपदेशकाची मदत घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.