Pune Police: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत पोलिसांनी मुंबईहून पुण्यातील सराफ व्यावसायिकांना पाठविलेले एक कोटी ५७ लाख रुपयांचे अडीच किलो सोने आणि चार कोटी १६ लाख रुपये किमतीची साडेचार किलो चांदी असा सुमारे पावणेसहा कोटींचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत प्राप्तीकर विभाग आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागास माहिती देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.