धक्कादायक! Mobile वर सुरु असलेली मालिका बंद केल्याने मुलाने आईवर केला कात्रीने हल्ला; खिडकीच्या फोडल्या काचा अन्..

Pune Crime : या प्रकरणी आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
Pune Crime
Pune Crimeesakal
Updated on
Summary

आईने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मालिका बंद केली. मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलगा आईवर चिडला.

पुणे : मोबाईल (Mobile) काढून घेत त्यातील मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाने आईवर (Mother) कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १४) रात्री धनकवडी भागात घडली.

या प्रकरणी आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या धनकवडी भागात राहायला आहे. त्यांचा मुलगा सोमवारी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवरील मालिका पाहत होता. त्यावेळी त्यांनी जास्त वेळ मोबाईलवरील मालिका पाहू नको, असे मुलाला सांगितले. त्यानंतर ही तो मालिका पाहत होता.

Pune Crime
बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप आमदाराला सशर्त जामीन मंजूर; कारागृहातून बाहेर पडताना केली होती अटक

आईला बेदम मारहाण

त्यामुळे आईने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मालिका बंद केली. मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलगा आर्इवर चिडला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील लाकडी फ्रेम फोडली, तसेच कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.