पुणे, ता. ३१ : एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३१) ताब्यात घेतले. या उपनिरीक्षकाविरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद दशरथ कणसे असे गुन्हा दाखल केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कणसे हडपसर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुध्द कोलकता येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट बजावले आहे. कणसे यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पाच हजार रुपये अगोदर घेतले.