Latest Pune News: दिवाळीत फटाके फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बंदुकीने भर रस्त्यात नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा घटना समोर आली आहे. वडगाव पूल ते वारजे पुलाच्या दरम्यान हा प्रकार घडला.
या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. शिवणे, उत्तम नगर) आणि सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघे व्यवसायाने पेंटर आहेत. हे दोघे शुक्रवारी (ता. १) दुचाकीवरून भरधाव निघाले होते. त्यावेळी भर रस्त्यात त्यांनी बंदूक हवेत फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.