Pune Crime News: जबरी चोरी करणाऱ्या दोघांना सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
Pune News - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ४६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.
ललित दीपक खोल्लम (वय २८) आणि मयूर दिलीप राऊत (वय २१, रा. गहुंजे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना जबरी चोरी चारी, अपहरण आणि इतर कलमांनुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत चंदन राजकुमार शर्मा (वय २०, रा. आंबेगाव) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १३ ऑगस्ट २०१५ च्या रात्री पुणे-बंगरुळ महामार्गावर हा प्रकार घडला होता.
फिर्यादी यांना आंबेगावला जायचे असल्याचे ते पुणे-बंगरुळ महामार्गावर पी. के. बिर्याणी हॉटेलजवळ थांबले होते. त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले.
त्यानंतर त्यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख ५० हजार रुपये आणि, दोन मोबाईल असा मिळून ७१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरला. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास तुझा जीव घेऊ अशी धमकी देवून त्यास चांदणी चौक येथे सोडून निघून गेले.
जाताना त्यांनी फिर्यादी यांच्या डोळ्यांवर मिरची पुडचा स्पे मारला होता. खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक संजय जाधव, पोलिस हवालदार पुणेकर, जाधव आणि पोलिस नार्इक गाढवे यांनी कामकाज पाहिले आहे.
खोल्लम आणि राऊत यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत, असे पोलिस तपासादरम्यान उघडकीस आले आहे.
दंडाच्या रकमेतील ५० हजार रुपये फिर्यादी यांना देण्यात यावे. गुन्हेगारांनी दंड भरला नाही तर त्यांना आणखी तीन महिने कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.