Pune Crime : पुण्यात गुन्हेगार मोकाट....कोण आवरणार? बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून केली चोरी

Latest Pune Crime News: डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुण्यात गुन्हेगार मोकाट....कोण आवरणार?  बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून केली चोरी
Pune Crime : sakal
Updated on

Pune Latest News: एरंडवण्यातील एका बंगल्यात घुसून चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड चोरी केले. ही घटना शनिवारी (ता. १०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गुन्हेगार मोकाट....कोण आवरणार?  बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून केली चोरी
Pune Crime: डेक्कन परिसरात खळबळ! मद्यधुंद चालक अपघात करून आला, शुद्ध हरपल्याने थांबला अन् पोलिसांनी पकडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटुंबासमवेत एरंडवण्यात जुन्या कर्नाटक शाळेजवळ भारती निवास कॉलनीत राहतात. शनिवारी (ता. १०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरटे बंगल्यात शिरले.

पुण्यात गुन्हेगार मोकाट....कोण आवरणार?  बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून केली चोरी
Pune Tanker Accident : उरुळीदेवाची येथे टायर फुटून टँकरचा अपघात

त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या महिलेसह कुटुंबीयांना बंगल्यात कोणीतरी शिरल्याचा आवाज आला. बंगल्याच्या बाहेर येऊन पाहिले असता सात-आठ चोरटे चंदनाचे झाड करवतीने कापत असल्याचे दिसून आले. महिलेने आरडाओरडा केला, तेव्हा चोरट्यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला. याबाबत महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल आणि सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पुण्यात गुन्हेगार मोकाट....कोण आवरणार?  बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून केली चोरी
Pune: कल्याणीनगरमधील नामांकित हॉटेल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? पोलीस आयुक्तांनी नोटीस पाठवल्याने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.