Pune Crime: दुधाच्या ट्रकमधून ‘पुष्पा’स्टाईल गांजाची वाहतूक, वाचा पोलिसांनी कशी केली कारवाई

Updated on

Latest Pune News: दूध वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून चक्क गांजाची वाहतूक केल्याचा प्रकार आळेफाटा येथे उघडकीला आला आहे. आळेफाटा पोलिसांच्या बोटा खिंड येथील नाकाबंदीवेळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २३ किलो गांजा व कंटेनर, असा एकूण ५० लाख ९२ हजार ९७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


सुदर्शन गोविंद डोंगरे (वय २४, रा. काळवाडी, ता. जुन्नर) देवसुंदर अमलेश मैथी (वय ४८, रा. दुर्गाचौक उत्तर दक्षिण पल्ली, हलदिया, पूर्व मेदिनीपूर, पश्‍चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.


विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आळेफाटा (ता.जुन्नर) पोलिस ठाण्याच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा खिंडीत स्थिर सर्वेक्षण पथकाची नाकाबंदी नेमण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २९) पहाटे ३.३०च्या सुमारास दूध वाहतूक करणारा एक कंटेनर (क्रमांक एम.एच.१४ जी.यु. ८०८८) नाकाबंदी पॉइंटवर आला असता पोलिसांनी ट्रक कंटेनर थांबवून चौकशी केली.

Pune Crime: दुधाच्या ट्रकमधून ‘पुष्पा’स्टाईल गांजाची वाहतूक, वाचा पोलिसांनी कशी केली कारवाई
Pune Crime: पार्किंगचा वाद भोवला..! निवृत्त जवानाने गोळी झाडल्याने एकाचा मृत्यू
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.