Wagholi: जिल्ह्यातून हद्दपार झालेला तरुण जिल्ह्यात फिरत असताना त्याला जेरबंद करण्यात आले आहे. तर बेकायदा गांजा बाळगणाऱ्याला व अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकाला युनिट सहाच्या पथकाने ताब्यात घेतले.
गणेश रामदास काळे ( वय 34 वर्षे रा. वाघेश्वर नगर, गायरान वस्ती, वाघोली ) असे जेरबंद केलेल्या तरुणाचे नाव आहे. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरी तो जिल्ह्यात फिरत होता. तो केसनंद येथे असल्याची माहिती पोलीस कर्मचारी ऋषिकेश व्यवहारे यांनी मिळाली. त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर जबरी चोरी (मोक्का ) गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल आहेत.