Pune Crime : कर्जाची परतफेड करूनही जीवे मारण्याची धमकी, सावकारासह दहाजणांविरुद्ध गुन्हा

कोरोना कालावधीत घेतलेल्या कर्जाची व्याजासह ८८ लाख रुपयांची परतफेड करूनही कर्जदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार
investment fraud of water filter 13 lakh a women police crime nagpur marathi news
investment fraud of water filter 13 lakh a women police crime nagpur marathi newsSakal
Updated on

पुणे : कोरोना कालावधीत घेतलेल्या कर्जाची व्याजासह ८८ लाख रुपयांची परतफेड करूनही कर्जदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोथरूड पोलिसांनी सावकारासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पौड रस्ता परिसरातील एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यावरून राहुल ऊर्फ दिगंबर पुरुषोत्तम काची (वय ३७), सुजित सुधीर लाजुळकर (वय ३४), विकी ढवळे (वय ३५), जयकुमार सदाशिव पाटील (वय ४०), बाळासाहेब ऊर्फ नितीन करंडे (वय ४२), अक्षय सागर, निखिल आल्हाट, संतोष उत्तम सोळसे (वय ३७) यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षण संस्थेत शिपाई असून, त्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये एकाकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते फेडण्यासाठी दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेतले. व्याज वाढत चालल्यामुळे त्यांनी इतर काहीजणांकडून कर्ज घेतले. त्यांनी सहाजणांना १० ते ४० टक्के व्याजासह ८८ लाख २५ हजार रुपये परत केले. परंतु आरोपी मुद्दल आणि व्याजाची मागणी करीत होते.

लाजुळकरने त्यांना कार्यालयाच्या बाहेर फाशी देण्याची धमकी दिली. तर निखिल आल्हाट, संतोष सोळसे आणि साथीदारांनी फिर्यादीला कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने तारण म्हणून त्यांच्या पत्नीचे २१ तोळे दागिने घेतले. परंतु कर्ज मंजूर करून न देता दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.