Indapur Crime : इंदापूर बस स्थानकाजवळील एटीएमसह देशभरातील विविध एटीएम मधून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात इंदापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पंजाब येथून दोघांना अटक केली. इंदापूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत इंदापूर बस स्थानकापरिसरात असलेल्या टाटा इंडीकॅश एटीएम मधून 8 जुन ते 12 जुन या दरम्यान 17 लाख 55 हजार रूपये चोरीस गेल्याचा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शक करीत तपासाबाबत सुचना दिल्या होत्या मात्र सदर चोरी झालेल्या टाटा इंडिकेश एटीएम मधील सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने,
एटीएम मशीन येथे सिक्युरिटी गार्ड नसल्याने तसेच चोरी झालेल्याची निश्चीत तारीख, वेळ माहिती नसल्याने तपासामध्ये अडचणी येत होत्या.मात्र गुन्हे शोध पथकाने इंदापूर शहरासह, दौंड, शिक्रापूर,
रांजणगाव उरुळी कांचन या परिसरातील अनेक सीसीटिव्ही कॅमेरे तपासात तांत्रिक माहितीच्या आधारे रचपल बलदेव सिंह (वय 36, वर्षे रा. भतींडा पंजाब) व लखवीर बलदेव सिंह (वय 29 वर्षे, रा.भतींडा पंजाब) यांना अटक केली.
या मधील सदर गुन्हयातील अटक आरोपी रचपल सिंह हा पूर्वी बँकेत नोकरी करत होता. त्यामुळे त्यांना एटीएम मशीन बाबत माहिती होती.
आरोपी यांनी इंदापूर येथील एटीएम मशीन खोलून त्यामध्ये पैसे भरण्याची कॅसेट जवळ स्पाय कॅमेरा बसवून एटीएम मशीनचा पासवर्ड स्पाय कॅमेराच्या रेकॉडींग मधून बघून त्यानंतर एटीएम मशीन उघडून त्यातील सर्व 17 लाख 55 हजार रुपये चोरी केले होते.
तसेच सदर आरोपी हे सराईत असून त्यांनी यापूर्वी सुपे (बारामती), तळेगाव (पुणे), गोवंडी (मुंबई), गंगापूर (राजस्थान) कोटा (राजस्थान) पठाणकोट (पंजाब) तसेच उत्तराखंड राज्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार,
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार प्रकाश माने,पोलिस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलिस नाईक सलमान खान, नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड संग्राम माने यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान आरोपी यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून या गुन्हाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.