Pune : प्रतिकूल परिस्थितीत करा पिकांचे संरक्षण,नुकसानीनंतर ७२ तासांमध्ये विमा कंपनीला कळवणे आवश्यक

या योजनेमध्ये विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते
Pune news
Pune newsesakal
Updated on

काटेवाडी : अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम व उत्तर भागांमध्ये शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि आर्थिक पाठबळ देणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा उद्देश आहे. या योजनेमध्ये विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

विमा कंपनी, कृषी विभाग यांचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करतात. यात तीन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. नैसर्गिक आपत्तीमुळे किती क्षेत्र बाधित झाले त्याची टक्केवारी निश्चित केली जाते. त्यामुळे मग त्या शेतकऱ्याच्या उत्पादनात किती घट होईल, हे पाहिले जाते. आणि मग पीक वाढीची अवस्था काय आहे, ते पाहिले जाते पीक वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादन खर्च बदलत असतो. ही पाहणी केल्यानंतर मग त्यानुसार नुकसान भरपाईचा दावा निश्चित केला जातो. तसेच शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

Pune news
Health Care News: प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र. २१.५.१० नुसार विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास होणारे नुकसान ही बाब जलप्रिय (Hydrophilic Crops) उदा. भात, ऊस, ताग या पिकांना लागू नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्याने ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनी प्रतिनिधी, थेट संबंधित बँक, कृषी विभाग जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत गावाची माहिती द्यावी.

Pune news
Health Care News: फक्त दारूच नाही तर 'या' गोष्टींनीही तुमचं लिव्हर होऊ शकतं खराब!

क्रॉप इन्शुरन्स अॅपवर माहिती कळवणे आवश्यक

अधिसूचित पिकांचे नुकसान है वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. विमाधारक शेतकऱ्याने आपत्तीनंतर ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२६०७०० किंवा क्रॉप इन्शुरन्स अॅप वर माहिती कळवणे आवश्यक आहे. या माहितीत ७/१२ वरील सर्वे नंबर नुसार पिकांचा तपशील आणि हेक्टरी नुकसान याचा समावेश असवा, शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो. परंतु अर्जातील उर्वरित माहिती सात दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

Pune news
Health Care News: फक्त दारूच नाही तर 'या' गोष्टींनीही तुमचं लिव्हर होऊ शकतं खराब!

पेरणी/ लावणी/ उगवण न होणे

हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.

Pune news
Health Care News: फुफ्फुस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज करा ही योगासनं, जाणून घ्या

पेरणी ते काढणीपर्यंतच्या उत्पादनातील घट

दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून व्यापक संरक्षण दिले जाईल.

Pune news
Health Tips: वेळेची कमतरता असेल तर फक्त 10 मिनिटांत करा फुल बॉडी वर्कआउट

ही माहिती देण्यासाठी चार पर्याय उपलब्ध

केंद्र सरकारच्या पीक विम्याच्या मोबाईल अप्लिकेशनवर नुकसानीची माहिती नोंदवता येते.

शेतकऱ्याकडे मोबाईल नसेल तर विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर ही माहिती नोंदवता येते.

विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात जाऊन तिथे सूचना फॉर्म भरता येतो.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ज्या बँकेतून विम्याची रक्कम भरलीय, त्या बँकेत ही माहिती देता येते.

Pune news
Laughing Health Benefits: मनमोकळेपणाने हसणे तुम्हाला या आजारांपासून दूर ठेवू शकते! जाणून घ्या

विमा भरण्याची तारीख महत्त्वाची

शेतकरी एखाद्या पिकाचा विमा ज्या तारखेस उतरवतात ती तारीख सगळ्यात महत्त्वाची असते. पीक विमा ज्या दिवशी भरला जातो, त्या दिवसापासून त्याचे कव्हरेज सुरू होते समजा तुम्ही १५ ऑक्टोबर रोजी पीक विमा भरला आणि तुमच्या भागात १३ ऑक्टोबरला पाऊस झाला, तर अशावेळी हे नुकसान पीक विम्यासाठी कव्हर केलं जात नाही. म्हणजे १५ ऑक्टोबरनंतर झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठीच तुम्ही अर्ज करू शकता.

Pune news
Laughing Health Benefits: मनमोकळेपणाने हसणे तुम्हाला या आजारांपासून दूर ठेवू शकते! जाणून घ्या

योजनेचा फायदा

सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचितपिकांसाठी असेल.

अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहे.

ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे, ज्या शेतकऱ्यांनी अधिसूचित पिकासाठी कोणत्याही वित्तीय संस्थांकडून हंगामी पीक कर्ज घेतले आहे आणि जे अंतिम मुदतीच्या सात दिवस बाहेर पडलेले नाहीत, असे शेतकरी त्यांच्या वित्तीय संस्थांद्वारे योजनेत नाव नोंदणी करण्यास पात्र असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.