Pune : केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीचा निर्णय घेतल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा ; प्रभाकर बांगर

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केल्याची माहिती समजते. हा निर्णय घेऊ नये.
 स्वाभिमानी शेतकरी संघटना
स्वाभिमानी शेतकरी संघटनाsakal
Updated on

मंचर : “केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयातीचा निर्णय घेतल्यास दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडतील. दुर्दैवाने आयातीचा निर्णय झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जेल भरो आंदोलन केले जाईल.”असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.

पिंपळगाव-खडकी (ता.आंबेगाव) येथील श्रीराम दूध उत्पादक सहकारी संस्थेच्यासमोर रविवारी (ता.९) दुध उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले. यावेळी प्रभाकर बांगर बोलत होते. याप्रसंगी वनाजी बांगर, सतीश वाबळे, बाबाजी पोखरकर, सुभाष पोखरकर, संदीप बांगर ,संतोष पोखरकर, राहुल बांगर, ज्ञानेश्वर पोखरकर, रामदास बांगर ,नवनाथ पोखरकर, जनार्धन पोखरकर, कुंडलिक अरगडे उपस्थित होते.

प्रभाकर बांगर म्हणाले “कांद्यासह अन्य शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मार्च अखेरीस अनेक शेतकऱ्यांना सहकारी संस्था व बँकांचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाहीत. दुध व्यवसायामुळे शेतकरी कुटुंबाना आधार मिळाला आहे. दुधापासून प्रामुख्याने विविध उपपदार्थ व दुध पावडर तयार केली जाते.

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केल्याची माहिती समजते. हा निर्णय घेऊ नये. घेतल्यास शेतकरी राज्य व केंद्र सरकारला ‘सळो की पळो’ केल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्यात आंबेगाव तालुक्यातून आंदोलनाची सुरुवात केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.