Pune Dam : भामा आसखेड मधील विसर्ग अवघ्या १२ तासांत बंद

२३ तारखेला रात्री १० वाजता धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून पाणी ६२० क्युसेस वेगाने भामा नदीपात्रात सोडण्यात आले होते
dam
dam sakal
Updated on

आंबेठाण - भामा आसखेड (ता.खेड) धरणातून काल रात्री (दि.२३) दहा वाजता सुरू करण्यात आलेला विसर्ग आज (दि.२४) सकाळी १० वाजता बंद करण्यात आला आहे.या वर्षी प्रथमच धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला होता.

मागील वर्षी धरणातून १० ऑगस्टला पहिला विसर्ग सोडण्यात आला होता.खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या तुलनेत या वर्षी भामा आसखेड धरण खूप उशिरा भरले आहे.मागील दोन ते दिवसांपासून धरण परिसरात पाऊस पडत असल्याने पाणीसाठा बऱ्यापैकी जमा झाला आहे.

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण असून धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ६७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

dam
Pune Festival 2023 : पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर अवतरली ‘गंगा’

२३ तारखेला रात्री १० वाजता धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून पाणी ६२० क्युसेस वेगाने भामा नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यासाठी दरवाजे १० सेंमीने उचलले होते.परंतु पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने धरणात जमा होणारी पाण्याची आवक कमी झाली.त्यामुळे विसर्ग अवघ्या १२ तासात बंद करण्यात आला.

dam
Pune News : वारे गुरुजी ‘अग्निपरीक्षे’त उत्तीर्ण!

पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग सुरू करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती

सहाय्यक अभियंता ( श्रेणी १ ) अश्विन पवार,शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख,कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे.

dam
Pune Ganeshotsav : तंदुरुस्त बंदोबस्तासाठी पोलिसांना चिक्की वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()