Pune Dam: चासकमान धरणात शंभर टक्के पाणीसाठा; खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला

धरण प्रशासनाकडून माहिती.
Pune Dam
Pune DamSakal
Updated on

चास - खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असून चास-कमान धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. तरी सद्य:स्थितीत धरणात १०० टक्के (८.५३ टीएमसी) पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरणात २१.२९ टक्के (२.५७ टीएमसी) पाणीसाठा होता. त्यावेळी पाऊस लांबल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. तसेच अमर्याद पाणी सोडल्याने धरणातील पाणी संपल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्याने ही धरणे तुडूंब भरली.

Pune Dam
Mumbai Local Train: कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकलची वाहतूक उशीराने

पावसाचा जोर कायम राहिल्याने सर्वप्रथम चास-कमान धरण साखळीत असणारे कळमोडी धरण १७ जुलै रोजी ‘ओव्हफ्लो’ झाले. त्याचे पाणी चास-कमान धरणात येण्यास सुरुवात झाली होती. तसेच भिमाशंकर खोऱ्यात पावसाचा जोर वाढल्याने चास-कमान धरणातील पाणीसाठ्याने नव्वदी पार केली होती.

चास-कमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात २८ जुलै रोजी विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त करण्यात येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला असून ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे.

Pune Dam
Mumbai: भटक्या श्वानांचा 5 जणांना चावा; कल्याण पश्चिमेत भटक्या श्वानांची दहशत

त्यामुळे धरणात येणारी आवक जवळपास थांबली असल्याने धरणाचे उघडलेले पाचही दरवाजे बंद केले आहेत. धरणात सद्य: स्थितीत १०० टक्के पाणीसाठा असून वीज निर्मितीनंतर भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक, तर धरणाच्या कालव्याव्दारे ५५० क्यूसेक असा एकूण ८५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात एक जूनपासून ३४२ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Pune Dam
Mumbai Local Train: कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकलची वाहतूक उशीराने

पवना धरणामध्ये शंभर टक्के साठा

पिंपरी शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. यावर्षी साधारण पंधरा दिवस उशिरा पावसाने हजेरी लावली. तेव्हापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. अधून-मधून होणाऱ्या संततधार पावसामुळे धरणातील साठा वाढण्यास विलंब झाला.

आतापर्यंत धरण क्षेत्रात दोन हजार १६९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ७९३.४७ क्यूसेकप्रमाणे विसर्ग सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून दररोज ५१० दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. दरवर्षी जुलैअखेरपर्यंत पाणी पुरेल, अशा पद्धतीने धरणातील पाण्याचे नियोजन केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()